PVR Subscription Plan : 70 रुपयांत थेटरमध्ये जाऊन Movie पाहता येणार; PVR घेऊन येतंय सबस्क्रिप्शन प्लॅन

PVR Subscription Plan : घरात बसून बघितले जाणारे चित्रपट आणि चित्रपट गृहात जाऊन बघितलेले चित्रपट यांच्यात भरपूर फरक असतो. चित्रपट अनुभवला जातो तो मोठ्या स्क्रीनसमोर, जिथे बसून असं वाटत कि समोर घडणारी गोष्ट हि प्रत्यक्षात आपण जगात आहोत कि काय. चित्रपटातील ती पात्रे खरोखरच आपल्या समोर उभी आहेत असाच तो भास असतो. मात्र आजकाल चित्रपटगृहात जाऊन मजा घेणं म्हणजे खर्चिक काम झालं आहे, एका चित्रपटामागे निदान 500 ते 1000 रुपये नक्कीच जातात. मात्र सिनेमाच्या चात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला केवळ 70 रुपयांत थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहता येणार आहे. कसे ते आम्ही सांगतो.

PVR Cinema आणतोय नवीन प्लॅन :

सध्या PVR एक नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन (PVR Subscription Plan) आणण्याच्या तयारीत आहे. या प्लॅनमुळे सिनेमाच्या चाहत्यांना महिन्याला केवळ 699 रुपयांमध्ये दहा चित्रपट पाहण्याची उत्तम संधी मिळणार आहे. PVR Inox च्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी हि नवीन योजना सुरु करण्याचा विचार सुरु आहे. साधारणतः 35 ते 40 वयोगटातील मंडळींना चित्रपट गृहांमध्ये घेऊन येणं यासाठी त्यांची आखणी आहे.

असा आहे नवीन प्लॅन : PVR Subscription Plan

या प्लॅनमध्ये एका माणसाला एका महिन्यात केवळ 699 रुपयांमध्ये १० चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे. मात्र हे चित्रपट केवळ सोमवार ते गुरुवार या दिवसांमध्येच पाहावे लागतील. इतर दिवशी जर का तुम्ही चित्रपट गृहांमध्ये गेलात तर तुम्हाला बाकी लोकांप्रमाणे नवीन तिकीट काढून चित्रपट पाहावा लागेल.

या प्लॅनच्या अंतर्गत तुम्ही एका दिवसाला केवळ एकाच चित्रपट पाहू शकता. शिवाय हे तिकीट विकत घेताना सोबत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. कंपनीचा हा प्लॅन दक्षिण भारत,आय्मेक्स यांसारख्या मोठ्या स्क्रीनवर मिळणार नाही. कोरोनाच्या महामारीनंतर चित्रपट गृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची संख्या कमी झाली आहे, तीच संख्या पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी अश्या योजना सुरु केल्या जात आहेत, आता जर का खरोखर हि योजना सुरु झाली तर असा प्लेन आणणारी PVR हि पहिलीच कंपनी असेल.