Q3 Results: जाणून घ्या टाटा सोबत जाहीर झालेल्या ‘या’ कंपन्यांचे तिमाही निकाल

Q3 Results: टाटा कंपनीने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत आणि त्यानुसार कंपनीच्या तिमाही दर तिमाही आधारित आकड्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे नुकसान 310 कोटी रुपयांवरून 308 कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. याचबरोबर, कंपनीची एकूण उत्पन्न 287 कोटी रुपयांवरून 296 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. EBITDA 126 कोटी रुपयांवरून 136 कोटी रुपयांपर्यंत वाढला असून EBITDA मार्जिन 43.9 टक्क्यांवरून 45.9 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

पंजाब केमिकल्सचा तिमाही निकाल: (Q3 Results)

टाटा कंपनीसोबतच पंजाब केमिकल्सने तिमाही निकालांची घोषणा केली आहे. 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा नफा 20 कोटी रुपयांवरून 11.2 कोटी रुपयांवर घसरला आहे. परिणामी कंपनीचे उत्पन्न देखील 260 कोटी रुपयांवरून 214 कोटी रुपयांवर घसरले आहे आणि EBITDA 35 कोटी रुपयांवरून 26 कोटी रुपयांवर घसरला आहे. EBITDA मार्जिन 13.4 टक्क्यांवरून 12.2 टाक्यांपर्यंत घसरले आहे.

उषा मार्टिन कंपनीचा असा आहे तिमाही निकाल:

उषा मार्टिन या कंपनीने त्यांच्या तिमाहीचे निकाल (Q3 Results) जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 84 कोटींवरून 108 कोटींपर्यंत वाढला आहे. कंपनीची एकूण उत्पन्न 797 कोटींवरून 834 कोटींपर्यंत वाढले आहे आणि EBITDA मार्जिन 15.2 टक्क्यांवरून 19.7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.