Radhika Gupta Success Story : सोनी टीव्हीवर सुरू असलेला शार्क टॅंक इंडिया हा रियालीटी शो अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. देशभरातून विविध उद्योगांना इथे सादरीकरणाची संधी दिली जाते. हे सादरीकरण मनासारखे वाटल्यास आणि या व्यवसायातून नफा कमवता येईल अशी खात्री पटल्यास उपस्थित शार्क यांच्या व्यवसायामध्ये काही टक्क्यांची गुंतवणूक करतात. सध्या सोनी टीव्हीवर शार्क टॅंक इंडियाचा तिसरा सीजन सुरू होणार आहे आणि या नवीन सीझनमध्ये राधिका गुप्ता या नवीन शार्क म्हणून जबाबदारी सांभाळतील. राधिका गुप्ता या सध्या देशभरात सर्वात तरुण सीईओ म्हणून ओळखल्या जातात, थोडीशी वाकडी मान असल्याने आतापर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला होता, मात्र कुठेही हार न मानता त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. आणि याच परिणामी आज त्या सर्वात यंग CEO म्हणून ओळखल्या जातात.
राधिका गुप्ता आहेत सोनी टीव्हीच्या नवीन शार्क: (Radhika Gupta Success Story)
22 जानेवारी 2024 पासून पुन्हा एकदा सोनी टीव्हीवर शार्क टॅंक इंडिया सुरू होणार आहे. हा शार्क टॅंकचा तिसरा सीजन असून नवीन गुंतवणूकदारांना येथे संधी देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार आता शार्क टॅंक मध्ये एकूण बारा शार्कना गुंतवणूक करण्याची संधी मिळाली आहे, ज्यात प्रामुख्याने रितेश अग्रवाल, दीपिंदर गोयल आणि राधिका गुप्ता हे नवीन गुंतवणूकदार म्हणून सामील होतील. केवळ 40 वर्षांच्या राधिका गुप्ता या Edelweiss MF या कंपनीच्या सीईओ आणि एमडी आहेत. जुन्या गुंतवणूकदारांपैकी अमान गुप्ता, नमिता थापर, विनिता सिंग, अनुपम मित्तल हे देखील सोनी टीव्हीवर गुंतवणूक करताना पाहायला मिळतील.
पाकिस्तानात झाला होता राधिका यांचा जन्म:
तरुण CEO म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधिका गुप्ता यांचा जन्म 1983 साली पाकिस्तान मध्ये झाला होता. जन्माच्या वेळीस गळ्याचे हाड तुटल्याने त्यांची मान आजही वाकडीच आहे, मात्र या शारीरिक कमकुवतपणाचा त्यांनी कधीच आपल्या करिअरवर परिणाम होऊ दिला नाही. या मानेचा त्रासामुळे त्यांना अनेक प्रकारचे परिणाम सोसावे लागले होते. तरीही त्या कधीच खचून गेल्या नाहीत(Radhika Gupta Success Story) आणि कायम आपली वाटचाल सुरु ठेवली.
त्यांचे वडील भारतीय विदेश सेवेत अधिकारी असल्याने त्यांनी पाकिस्तान, दिल्ली, नायजेरिया, न्यूयॉर्क अशा विविध देशांची सफर केली आहे. कम्प्युटर सायन्स आणि अर्थशास्त्र यामध्ये पदवी मिळवलेल्या राधिका यांचे जीवन पूर्णपणे संघर्षमय आहे. एवढे शिक्षण प्राप्त करून सुद्धा अनेक ठिकाणी प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अनेक कष्ट करूनही नोकरी न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या करायचा देखील प्रयत्न केला होता. मात्र हा वाईट काळ सुद्धा मागे सारत वर्ष 2009 मध्ये भारतात परतलेल्या राधिका यांनी आपल्या पती तसेच मित्रांच्या मदतीने फोर फ्रेंड कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी सुरू केली(Radhika Gupta Success Story). पुढे जात या कंपनीचे एंडलवाईस म्युचल फंड यांनी अधिग्रहण केले आणि म्हणूनच आता चाळीस वर्षांची राधिका गुप्ता ही एक लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे नेतृत्व करीत आहे.