Raghuram Rajan : भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली युवा पिढी. जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपल्याकडे असलेली युवा शक्ती हि सर्वात अधिक आहे आणि येणाऱ्या काळात परदेशातून आपल्याला कामाच्या संधी उपलब्ध होतील अश्या चर्चा केल्या जात आहेत. अलीकडेच इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांनी वक्तव्य केले होते की आठवड्यातून 70 तास काम केल्याने आपण जगावर राज्य करू शकतो कारण आपली सर्वात मोठी ताकद हि युवा शक्तीच आहे. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी रघुराम राजन यांनी युवा आणि रोजगार याबद्दल अजून एक महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे, काय म्हणतायत रघुराम राजन पाहूयात…
काय म्हणाले रघुराम राजन: (Raghuram Rajan)
रघुराम राजन यांनी म्हंटल कि, आपल्या देशाची जनसंख्या हि दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि देश पुरेश्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. त्यांच्या माते देशाची ग्रोथ रेट 8 ते 8.5 टक्के नक्कीच असली पाहिजे पण युवकांच्या तुलनेत आपल्याजवळ व्यवसायाच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे आपली प्रगती अडकून पडलेली आहे.रिसर्च सेंटर फॉर मॉनेटरिंग इंडियन इकोनोमीचा दाखला देत ते पुढे म्हणाले कि यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या देशात बेरोजगारीचा आकडा 10.05 टाके होता जी खरोखरच धोक्याची घंटा ठरू शकते, आणि म्हणूनच एचएसबीच्या अहवालानुसार येत्या 10 वर्षात देशात नवीन 7 कोटी नोकऱ्या तयार होण्याची अत्यंत गरज आहे.
रघुराम राजन (Raghuram Rajan) पुढे म्हणाले, कि चीनसारख्या देशाला मागे टाकायचं असेल तर आपल्याला वर्कफोर्स ट्रेंड सुरु केला पाहिजे. टाटा समूह सध्या या दिशेने सकारात्मक पाऊलं टाकतोय, कंपनीकडून केलं जाणारं आयफोन मेन्यूफक्चारिंग हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे आणि देशातील बाकी कंपन्यांनी यापासून शिकवण घेतली पाहिजे. यासोबतच देशाने अधिकाधिक चीप तयार करण्यावर भर दिली तरच येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा ठरू शकतो.