Rahul Gandhi Investment: सध्या आपल्याकडे निवडणुकांचं वारं अगदी जोरदार वाहत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार की काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी मिळणार? याकडे देशातील प्रत्येकाची नजर खिळून आहे. केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी उमेदवारीसाठी अर्ज केला असून त्यांनी त्यांच्या निवडणूकीच्या कागदपत्रिकेत आपली कमाई, उत्पन्न, कर्ज, आणि गुंतवणुकीची माहिती पुरवली आहे.
किती आहे राहुल गांधीची गुंतवणूक? (Rahul Gandhi Investment)
निवडणूकीच्या कागदपत्रिकेतून सांगितल्यानुसार, राहुल गांधींनी जवळपास 4.3 कोटी रुपयांची गुंतवणूक Stock Market मध्ये केलेली असून यात एकूण 24 कंपन्यांच्या स्टॉकचा समावेश आढळतो. त्यांनी आदानी ग्रुप आणि रिलायंस सोबत स्टॉक मार्केटमध्ये संबंध ठेवलेले नाहीत. आत्तापर्यंत आपल्याला राहुल गांधी आणि अदानी- अंबानी यांचे राजकीय संबंध माहिती होतेच, मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत देखील गांधी या दोघांसोबत नाहीत हे मात्र नक्की.
TCS सोबत गुंतवणूक:
राहुल गांधींनी विविध शेअर्समध्ये गुंतवणूक केली असून यामध्ये खालील प्रमाणे कंपन्यांचा समावेश होतो:
- TCS
- ICICI Bank
- सुप्रजित इंजिनिअरिंग
- पिडिलाइट इंडस्ट्रीज (42.27 लाख)
- बजाज फायनान्स (35.89 लाख)
- एशियन पेंट्स (35.29 लाख)
- दीपक नायट्राइट
- डिव्हीस् लॅबोरेटरीज
- इन्फोसिस
- नेस्ले (35.67 लाख)
- टायटन (32.59 लाख)
शिवाय त्यांनी Mutual Funds मध्ये 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती उघड केली आहे. यामध्ये;
- SBI
- HDFC (Small Cap 1.23 कोटी) (Mid Cap 19.58 लाख)
- ICICI (1.02 कोटी), ICICI (EQ and DF 19.03 लाख)
- पराग पारीख फ्लॅक्सि कॅप( 19.76 लाख)
अश्याप्रकारे रक्कम गुंतवली आहे.
राहुल गांधी यांच्या Gold Bond मधील गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी आत्तापर्यंत इथे 15.21 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत (Rahul Gandhi Investment). एवढंच नाही तर राहुल गांधी यांची PPF, Postal Savings आणि NCDs मध्ये गुंतवणूक केलेली आढळते. सर्वात शेवटी राहुल गांधींवर 49.7 लाख रुपयांची देणी देखील बाकी आहे आणि यांच्याकडे एकूण 9,24,59,264 रुपयांची मालमत्ता आहे, पैकी एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपये असल्याने त्यांची एकूण संपत्ती 20,38,61,862 रुपये असल्याची माहिती उघड झाली आहे.