Rahul Gandhi On Adani : राहुल गांधीनी अदानींवर आरोप करताना ज्या चिनी व्यक्तीचं नाव घेतलं तो ‘चांग चुंग ली’ आहे तरी कोण?

बिझनेसनामा ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा श्रीमंत उद्योगपती आणि अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यावर (Rahul Gandhi On Adani) आरोपांचे बॉम्ब टाकले. पत्रकार परिषदेत अदानी समूहाने गैरव्यवहार केल्याचा आरोप करताना राहुल गांधी यांनी द गार्डीयन आणि फायनान्शियल एक्स्प्रेस या वृत्तपत्रांचा दाखला दिला. यावेळी राहुल गांधी यांनी चीनच्या ‘चांग चुंग लींग’ नावाच्या व्यक्तीचे नाव घेतलं. चांग चुंग लींग याचे अदानी यांच्यासोबत संबंध असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

काय आहेत आरोप? (Rahul Gandhi On Adani)

चँग चुंग लिंग द्वारे चालवलेली संस्था (गुडामी इंटरनॅशनल) ही भारतातील सर्वात मोठ्या आणि चालू असलेल्या लाचखोरी घोटाळ्यांपैकी एक असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील मोठ्या भ्रष्टाचाराच्या योजनेचा भाग असल्याचे सांगण्यात आले. चांग चुंग लिंगचा मुलगा हा अदानी समूहाच्या PMC प्रोजेक्ट्स नावाच्या प्रमुख कंत्राटदाराचा लाभार्थी मालक आहे. अदानी (Rahul Gandhi On Adani) आणि चांग चुंग लींग यांची भागिदारी आहे, सिंगापूर येथे ते एकाच कार्यालयात काम करतात असा आरोप काँग्रेसने केला होता.

कोण आहेत चँग चुंग लिंग?

चांग-चुंग-लिंग हे गुडामी इंटरनॅशनलचे संचालक आहेत. 24 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या हिंडेनबर्ग अहवालात चांग-चुंग-लिंग हे संचालक असलेल्या कंपनीचा अदानी समूहाशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंडनबर्ग अहवालात चुंग-लिंगचा उल्लेख ग्रोमोर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटशी संबंधित आहे, ज्याने 2011 मध्ये अदानी पॉवरमध्ये $423 दशलक्ष नफा कमावला. कोर्टाच्या नोंदींच्या मदतीने अहवालात असे दिसून आले आहे की, ग्रोमोरचे नेतृत्व चुंग-लिंग यांनी केले आहे आणि हे ‘अदानी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या अपारदर्शक खाजगी संस्थेला विंडफॉल लाभ’ असल्याचे सूचित करते.