Railway Stocks : रेल्वे कंपन्यांचे स्टॉक वाढणार; ट्रेनमधील वाढत्या सुधारणा पडणार पथ्यावर

Railway Stocks: भारतीय रेल्वे विभागात सध्या अनेक बदल घडून येत आहेत. देशात आजही रेल्वे म्हटलं कि अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, कारण रेल्वेचा प्रवास हा आपल्यासाठी नेहमीच आकर्षक ठरला आहे. गेल्यावर्षी रेल्वे विभागात झालेले दोन सर्वात मोठे बदल म्हणजेच वंदे भारत एक्क्सप्रेस आणि अमृत भारत एक्स्प्रेस होय. रेल्वे रुळांवरून ऐटीत धावणाऱ्या या दोन खास रेल्वेचं आकर्षण प्रत्येकालाच आहे. वंदे भारत ट्रेन ही प्रत्येक सामान्य माणसाला परवडणारी नव्हती, कारण रेल्वेचा प्रवास म्हटलं कि तो आटोक्यातच असेल अशी संकल्पना घेऊन आपण वावरत असतो. जनतेची हीच अडचण ओळखून नवीन अमृत भारत एक्सप्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन अमृत भारत एक्सप्रेसला अयोध्येतून हिरवा झेंडा दाखवला आणि तिने जगाला आपला वेग दाखवायला सुरुवात केली. याच दरम्यान सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसना मार्गक्रमण करण्याचा आदेश देण्यात आला होता. भारतीय रेल्वेच्या याच यशस्वी प्रवासामुळे कार्यरत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना खात्री आहे कि येणाऱ्या काळात रेल्वेच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टोक्समध्ये सुधारणा झालेली दिसून येईल, याचे विशेष कारण म्हणजे सरकार दरवर्षी 300 ते 400 अमृत भारत ट्रेन्सना चालना देणार आहे.

रेल्वे कंपन्यांचे स्टोक्स वाढणार:(Railway Stocks)

भारताच्या रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येणार काळ हा रेल्वे विभागासाठी चांगला ठरू शकतो. टिटागढ रेल्वे सिस्टम, इरकोन इंटरनेशनल, IARFC, BEML, IRTES, IRCTC, कंटेनर कॉर्प ऑफ इंडिया अश्या अनेक रेल्वे संबंधित कंपन्यांच्या स्टोक्समध्ये (Railway Stocks) बदलत्या सुविधांमुळे तेजी पाहायला मिळू शकते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात कि गेल्या साढे नऊ वर्षात देशातील रेल्वे रुळांमध्ये 26 हजार किलोमीटर्सची वाढ करण्यात आली आहे, याच अर्थ असा कि मागच्या काही वर्षांमध्ये रेल्वेचे नेटवर्क वृद्धिंगत झाले आहे. शिवाय सरकारने 30,749 कोटी रुपये खर्च करून रेल्वे रुळांना डबल केलं आहे. सध्या देश भरात अमृत भारत ट्रेनची चर्चा सुरु आहे, अगदी सामान्य माणसाला परवडणाऱ्या दारांत हि ट्रेन वंदे भारतचा अनुभव करवून देणार आहे. या सोबतच सरकारने रेल्वे विभाग पूर्णपणे बदलून टाकण्याचा विचार पक्का केला असून, या दिशेने मार्गक्रमण सुरूच आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला वंदे भारत आणि अमृत भारत या दोन्ही ट्रेन्स फास्ट स्पीड आणि आरामदायक प्रवास यांची सांगड घालून देणार आहे.

मागच्या नऊ वर्षांत भारतीय रेल्वे विभाग तसेच प्रवास अनेक अंगांनी बदलला आहे. यात आधुनिक रेल्वेशिवाय नवीन रूळ बनवणे, रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण आणि मार्गांचे विद्युतीकरण या कामांनाही वेग आला आहे. गेल्या वर्षी रेल्वे विभागाने 31 मार्च 2023 पर्यंत 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठले आहे (Railway Stocks). यामुळे भारताचा आयात खर्च कमी होईल आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व देखील कमी होणार आहे.