Railway Ticket Cancellation : रेल्वे तिकीट कॅन्सल करताय? IRCTC चा हा नियम एकदा पहाच

Railway Ticket Cancellation: लहानपणपासूनच ट्रेनचा प्रवास आपल्यासाठी विशेष आकर्षण बनला आहे. मामाच्या गावाला जाणारी झुकझुक गाडी हि तेव्हापासूनच आपल्या पसंतीची आहे.मात्र देशात ट्रेनची संख्या कमी असल्यामुळे प्रवाश्यांना कन्फर्म तिकीट मिळवणं म्हणजे एखाद्या डोकेदुखीपेक्षा कमी नाही. यात काही प्रवासी असेही असतात जे कन्फर्म तिकीट तिकीट ऐनवेळी रद्द करतात. त्यामुळे सर्व प्रवाशांनी अवश्य नोंद घेतली पाहिजे अशी एक महत्वाची बातमी आज आम्ही देणार आहोत, कारण  IRCTC कडून तिकीट रद्ध करण्याबाबत नियमांमध्ये काही विशेष बदल करण्यात आले असून नुकसानी पासून सावध राहण्यासाठी तुम्हाला यांची माहिती असणं महत्वाचं आहे..

IRCTC ने बदललेत तिकीट रद्द करण्याचे नियम: (Railway Ticket Cancellation)

गेले दोन महिने आपण पूर्णपणे विविध सण साजरे केले, सणांची मजा लुटली. यावेळी अनेक लोकं अशीही होती ज्यांना या महत्वाच्या दिवसांसाठी घरी जाण्याची गरज होती. मात्र प्रवाश्यांच्या गर्दीमुळे कित्येक जणांना आपले वेटिंग तिकीट रद्द करावं लागलं, यात काही अश्याही प्रवाश्यांचा समावेश होता ज्यांनी विशेष कारणांमुळे कॅन्फर्म झालेली तिकीट रद्द केलं होते. मात्र आता IRCTC कडून तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये बदल केले गेले असून जर का तुम्ही स्वतःचे वेटिंग किंवा कन्फर्म तिकीट कुठल्याही कारणामुळे रद्द करण्याच्या विचारात असाल तर आधी हे नियम पडताळून पहाणे अत्यावश्यक आहे.

जी लोकं प्रवासाच्या आधी काही कारणामुळे आपलं तिकीट रद्द करतात त्यांना दोन पर्यायांमध्ये रिफंड दिला जातो. पर्याय एक मध्ये चार्ट तयार करण्यापूर्वी रद्द झालेल्या तिकिटांचा समावेश असतो तर दोन मध्ये चार्ट झाल्यानंतर रद्द केलेल्या तिकिटांचा समावेश करण्यात येतो. आता चार्ट म्हणजे काय? तर ट्रेन आपल्या स्थानकावरून निघण्याआधी ते 40 तास अगोदर विविध प्रकारच्या कोचसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट तयार केले जातात. ट्रेन आपल्या निश्चित स्थानकापासून प्रस्थान करण्यापूर्वी तुम्ही 12 तास अगोदर तुमचं तिकीट रद्द केलं (Railway Ticket Cancellation) असेल त्यानुसार लागणारी 25 टक्के किंवा कोचच्या आधारे लागू होणारी रक्कमं लागू केली जाते. पण यात जर का उशीर झाला तर तिकीट रद्द करताना 50 टक्के रक्कम कापली जाईल.

चार्ट तयार होण्याबाबत कोणते नियम आहेत?

रेल्वे विभागाच्या नियमानुसार चार्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्म तिकीट रद्द करता येत नाही आणि जर का तुम्ही असे करणार असाल तर तिकीटाची रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही DTR ची मदत घेऊ शकता पण त्याचे देखील वेगळे नियम लागू होतात जे की तुम्ही नक्कीच पडताळून पाहावेत. पण वेटिंग तिकीटवर तिकीट रद्द करण्याची गरज असत नाही ते जागेअभावी आपोआप रद्द (Railway Ticket Cancellation) होऊन जातं आणि मग 60 रुपये वजा करून उरलेले पैसे प्रवाशांना परत केले जातात.