Rajiv Jain: राजीव जैन हे नाव गेल्या वर्षी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने चर्चेत आले होते. हिंडनबर्ग रिसर्चच्या एका अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली तेव्हा जैन यांच्या GQG Partners या कंपनीने अडानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला होता. GQG Partners भारतात 22 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापित करते, मात्र देशातील सर्वात मोठ्या गुंतवणुकीला ही कंपनी मुकली आहे आणि जैन यांना LICच्या शेअर्समध्ये झालेली तेजी गमावण्याचा पश्चात्ताप आहे. LICच्या शेअर्समध्ये नुकतीच प्रचंड तेजी आली, कंपनीचा शेअर 9 फेब्रुवारीला सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.
LICमध्ये गुंतवणूक न केल्याचा जैन यांना पश्चाताप: (Rajiv Jain)
जैन यांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की त्यांना LIC चे शेअर्स खरेदी करायला आवडले असते पण ते या संधीला मुकले. GQG ने भारतातील Infra, Consumer Goods आणि Energy Sector मधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी गेल्या वर्षी अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना 2.4 अब्ज डॉलरचा फायदा झाला, मात्र जैन यांना LIC च्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्याचा पश्चाताप आहे.
राजीव जैन(Rajiv Jain) नावाच्या एका दूरदर्शी व्यक्तीने 2016 साली GQG Partners नावाची कंपनी उभारली. आज, GQG Partners जगभरातील प्रमुख गुंतवणूक कंपन्यांपैकी एक आहे. ते 92 अब्ज पेक्षा जास्त पैसे व्यवस्थापित करतात आणि अमेरिकेतील फ्लोरिडा मधून देखील काम करतात.