Ram Mandir Coin: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाविकांसाठी रामलल्ला यांचे एक विशेष चांदीचे नाणे जारी केले आहे. या नाण्यावर रामलल्ला आणि राम जन्मभूमी मंदिर अयोध्या असे चित्र कोरले आहे. याशिवाय आज त्यांनी बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर असलेली आणखी दोन नाणी देखील जारी केली.
आता रामललाचे नाणे विकत घ्या: (Ram Mandir Coin)
रामलल्ला आणि राम जन्मभूमी मंदिर अयोध्या यांच्यावर आधारित नाणे 50 ग्रॅम वजनाचे आणि 999 शुद्ध चांदीपासून बनवलेले आहे. राम मंदिराचे चित्र असलेले हे नाणे भाविकांसाठी खास आकर्षण ठरेल हे नक्की. या नाण्याव्यतिरिक्त अर्थमंत्रालयाकडून आज बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर आधारित दोन धातूंची नाणीही जारी केली गेली. या नाण्याचे 24 ग्रॅम वजन असून ती तांबे आणि स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली आहेत. या तिन्ही नाण्यांची किंमत वेगवेगळी आहे. रामलल्ला आणि राम जन्मभूमी मंदिर अयोध्या यांच्यावर आधारित नाण्याची किंमत 5 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे, तर बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर आधारित नाण्याची किंमत 3 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.
या नाण्याच्या दोन्ही बाजूंवर सुंदर चित्रे आहेत. एका बाजूला अयोध्येतील नवीन बांधलेल्या राम मंदिराचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात बसलेले दर्शवले आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेली रामलल्लाची मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. हे नाणे तुम्ही घरातील देव्हाऱ्यात ठेऊ शकता किंवा आप्तेष्ट आणि प्रियजनांना भेट करू शकता. https://www.indiagovtmint.in/souvenir-coins या भारत सरकारच्या अधिकृत साईटला भेट देऊन तुम्ही हे नाणं विकत घेऊ शकता(Ram Mandir Coin), सोबतच यांबद्दलच्या किमती पडताळून पाहू शकता.