Ram Mandir Donation : मंदिर निर्माणात सर्वात मोठा देणगीदार कोण? आतापर्यंत जमा झालेल्या देणगीचा आकडा 3200 कोटी रुपये

Ayodhya Ram Mandir : आज म्हणजेच 22 तारखेला अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झाली. या भव्य प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. पूर्ण विधी-विधानांसहित श्रीरामांच्या मूर्तीला याचदरम्यान मंदिरात स्थापन करण्यात आलं, सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1800 कोटी रुपयांपैकी 1100 कोटी रुपये खर्च करून मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. राम मंदिराचे अजूनही बांधकाम सुरूच असून काही लोकांनी जवळपास 3200 कोटी रुपये मंदिराला देणगी स्वरूपात दिले आहेत. आज मंदिर लोकार्पण सोहळ्यात उपस्थित किती जणांनी मंदिर निर्मितीसाठी कोणती रक्कम दिली हे जाणून घेऊया.

कोणाची देणगी सर्वात जास्ती? (Ram Mandir Donation)

सर्वाधिक देणगी म्हटलं की सहाजिकपणे तुमच्या मनात अदानी, अंबानी किंवा रतन टाटा यांची नावं येऊ शकतात, कारण आपल्या बाजारात या तीन उद्योगपतींना सर्वात श्रीमंत समजलं जातं मात्र तुम्ही असा विचार करत असाल तर तो सपशेल चुकीचा आहे. खरंतर मंदिर निर्माणासाठी वरील कोणत्याही उद्योगपतीने नाही तर देशभरातील कोट्यावधी लोकांनी, साधुसंतांनी, व्यावसायिकांनी देणगी म्हणून पैसे दिले आहेत. एका अहवालानुसार अशी माहिती समोर आली की, सुरत मधल्या काही कारागिरांनी राम मंदिरासाठी 101 किलो सोनं दान केलं आहे तसेच हिऱ्यांचा व्यवसाय करणारे दिलीप कुमार यांनी राम मंदिरासाठी सर्वात मोठी रक्कम दिली. दिलीप कुमार यांनी मंदिरासाठी 101 किलो सोनं दान केलंय, ज्याचा वापर मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचे दार आणि स्तंभ उभे करण्यात केला गेलाय. आपण जर का आताची सोन्याची किंमत पाहिली तर 10 ग्राम सोन्याप्रमाणे दिलीप कुमार यांनी नक्कीच 68 कोटी रुपये मंदिराला दिले आहेत.

दिलीप कुमार यांच्यानंतर सर्वात मोठे देणगीदार आहेत कथावाचक आणि अध्यात्मिक गुरु मोरारी बापू. मोरारी बापू यांनी राम मंदिर निर्माणासाठी जन्मभूमी ट्रस्टला 18.6 कोटी रुपये दिले आहेत. गुजरात मधल्या या अध्यात्मिक माणसाने सर्वात आधी मंदिर निर्मितीसाठी आर्थिक मदत केली होती (Ram Mandir Donation). देशविदेशात जाऊन श्री राम नामाचा प्रचार करत त्यांनी ही रक्कम जवळ केली आहे. असं म्हणतात की मोरारी बापू यांनी भारतातून 11.30 कोटी रुपये, युके आणि युरोप मधून 3.21 कोटी रुपये तर अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमधून 4.10 कोटी रुपये जवळ करून मंदिर निर्मितीसाठी दिले आहेत. भारतीय कंपन्या बद्दल विचार करायचा झाल्यास डाबर इंडिया तसेच आयटीसी(ITC) आणि हैवल्स यांनी राम मंदिर निर्माण मध्ये मदत केली आहे.