Ram Mandir Inauguration: 22 तारखेला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानंतर येणाऱ्या काळात हा प्राणप्रतिष्ठेचा दिवस नक्कीच एक ऐतिहासिक दिवस म्हणून कायमस्वरूपी इतिहासात कोरला जाईल. अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिराने आतापासूनच अधिकाधिक धार्मिक पर्यटकांना आपल्या दिशेने आकर्षित करायला सुरुवात केली आहे. असं म्हटलं जातं की, अयोध्येमुळे देशातील धार्मिक स्थळांबद्दल माहिती मिळवण्याचे प्रमाण वाढत आहे. Make My Trip ही आपल्या देशातील सर्वाधिक परिचयाची Travel Company आहे व त्यांच्या अनुसार गेल्या 2 वर्षात धार्मिक स्थळांबद्दल माहिती मिळवण्याचे प्रमाण 97 टक्क्यांनी वाढले आहे. वर्ष 2019 ते 2023 या काळात अधिकाधिक लोकं धार्मिक स्थळांना भेट देत आहेत आणि या सर्वांमध्ये जर का कोणी प्रमुख आकर्षण असेल तर ते आहे श्रीराम मंदिर.
अयोध्या सध्याचे वाढते आकर्षण: (Ram Mandir Inauguration)
Make My Trip यांनी सादर केलेल्या आकड्यांनुसार सध्या अयोध्येबद्दल सर्वाधिक चर्चा केली जात आहे. अयोध्ये बद्दल Search करण्याचा आकडा 585 टक्क्यांनी वाढला आहे आणि परिणामी यात्रेकरू अधिकाधिक धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छित आहेत. गेल्या 2 वर्षांच्या कार्यकाळात धार्मिक स्थळांच्या आकर्षणबद्दल आलेली ही एक प्रकारची तेजीच म्हणावी लागेल. अयोध्या मंदिर निर्माण सुरू होऊन बराच अवकाश लोटला आहे आणि 22 जानेवारीला इथे श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा केली जाईल, मात्र त्याआधीच अयोध्येला जाणाऱ्या पर्यटकांच्या रांगा वाढल्या आहेत.
Make My Trip च्या अनुसार अयोध्यातून श्रीराम मंदिर निर्माणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या सर्वाधिक वाढली होती. यावेळी अयोध्येबद्दल सर्च केला जाणारा आकडा 1806 टक्क्यांनी वाढला होता. काही दिवसांपूर्वी अयोध्येत महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि पुनर्निर्माण केलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आत्ताच्या घडीला केवळ अयोध्याच नाही तर उज्जैन, बद्रीनाथ, अमरनाथ, केदारनाथ, मथुरा, द्वारका, शिर्डी, हरिद्वार आणि बौद्ध गया यांसारख्या धार्मिक स्थळांवर जाण्याची अधिकाधिक माहिती मिळवली जात आहे.
केवळ देशच नाही तर, विदेशही म्हणतायत जय श्रीराम:
केवळ देशभरातूनच नाही तर विदेशातून देखील अयोध्येत बद्दल सर्वाधिक माहिती मिळवली जात आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेतून आतापर्यंत 22.5 टक्के तर, आखाती देशांमधून 22.2 टक्के अयोध्येबद्दल माहिती मिळवण्यात आली आहे (Ram Mandir Inauguration). याशिवाय कॅनडा, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियातील लोकं अयोध्या आणि राम मंदिराबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. देश विदेशात सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेली अयोध्या नगरी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी किती तुडुंब भरते हे पाहणं आकर्षक ठरणार आहे.