Ram Mandir Pran Pratishtha : आज अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि खऱ्या अर्थाने देशाला राज्यकरता मिळाला. प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला जाईल असा आजचा अभूतपूर्व सोहळा होता. आपल्यापैकी अनेकांनी घर बसल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतलाच मात्र काही लोकं अशीही होती ज्यांना या भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या बाजारातील अनेक मोठमोठाल्या उद्योजनकांपैकी मुकेश अंबानी संपूर्ण परिवारासह मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित होते.
अयोध्येत अंबानींनी लावली सहकुटुंब हजेरी : (Ram Mandir Pran Pratishtha)
अयोध्येत पार पडलेल्या भव्य सोहळयाला मुकेश अंबानी सपत्नीक उपस्थित होते. या सोहळ्याला अनिल अंबानी यांनी देखील उपस्थिती लावून श्रीरामांचे आशीर्वाद मिळवले. एवढंच नाही तर अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहता देखील यावेळी अयोध्येत हजार होते, त्यानंतर सर्व कुटुंबाला मुलगी इशा अंबानी आणि तिचा नवरा आनंद परिमल यांनी साथ दिली. या भव्य सोहळ्यदरम्यान मुकेश अंबानी यांनी जवळच्या माणसांशी भेट घेतली होती.
शिवाय या सोहळ्याला वेदांत समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल हे देखील उपस्थित होते. अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या इलेकट्रीक ओपन करमधून परिसरात प्रवेश केला. अंबानी आणि अग्रवाल वगळता बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांची मुलगी अनन्या बिर्ला तसेच भरती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल हे सुद्धा राम मंदिर लोकार्पण सोहळयाला हजार होते(Ram Mandir Pran Pratishtha). भारतात घडलेला हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी केवळ बाजारी हस्तीच नाही तर इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती जसे की अनुपम खेर, अमिताभ बच्चन, कंगना रानौत, सचिन तेंडुलकर आणि आपल्या जुन्या रामायणातील राम म्हणजेच अरुण गोविल हे देखील उपस्थित होते.