Ram Mandir Prasad : राम मंदिर प्रसादचा नकली खेळ, Amazon अडकला CAITच्या जाळ्यात!

Ram Mandir Prasad : राम मंदिर लोकार्पणाचे चर्चा केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण भारतभर आणि जगभारत सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी सर्वांची उत्सुकता पणाला लागली आहे, मात्र राम मंदिराच्या नावाखाली अनेकजणांचे फसवे व्यवसाय सुरु आहेत, ज्यांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. समोर आलेल्या ताज्या बातमीनुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ च्या दाव्यासह मिठाई विकून फसव्या व्यापार केल्याच्या आरोपाट Amazon ला जबाबदार धरलं आहे. Confederation of All India Traders (CAIT) कडून Amazon च्या नावे नोटीस जारी करण्यात आली आहे.

फसवा प्रसाद विकल्यामुळे Amazon धोक्यात : (Ram Mandir Prasad)

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा आवाका केवळ अयोध्येपर्यंत सीमित नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त मंडळी रामाच्या आगमनाच्या तयारीत गुंतलेली आहेत, मात्र अश्या व्यस्त काळात काही फसव्या प्रवृत्तीच्या माणसांनी राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली खोटा व्यवसाय सुरु केला आहे. Amazon या प्रसिद्ध शॉपिंग वेबसाईटचा वापर करून या फसव्या व्यापाराला चालना दिली जात असून आता हा सर्व खोटेपणा जनतेसमोर उघड झालाय. तसेच, Confederation of All India Traders (CAIT) कडून Amazon च्या नावे नोटीस जारी करण्यात आली आहे.

ही नोटीस जारी झाल्यानंतर Amazon सावध झाला आहे आणि कंपनीकडून या फसव्या व्यापाराच्या विरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे, आणि कंपनीने राम मंदिराच्या प्रसाद विक्रीचे पर्याय काढून टाकले आहेत. सध्या अमेझॉनला काही विक्रेत्यांकडून दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या दाव्यांबाबत CCPA कडून तक्रारी प्राप्त झाल्या असून कंपनीकडून या तक्रारींची चौकशी केली जात आहे. आता जर या तक्रारींमध्ये सत्यता आढळली तर संबंधित विक्रेत्यांना कारवाई केली जाईल (Ram Mandir Prasad). CCPA ने जाहीर केलेल्या राम मंदिर लोकार्पणाचे कारण साधून Amazon वर विविध प्रकारच्या मिठाईची विक्री सुरु असून, “श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद” या नावाखाली काही फसवे व्यापारी ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत.