Ram Mandir Pratishtha : मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी अंबानींनी ‘असे’ सजवले घर; देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणतोय “जय श्रीराम”

Ram Mandir Pratishta : आज अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आली, रामलला आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. हा दिवस संपूर्ण देशात एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला गेलाय. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना हा दिवस दिव्यांच्या रोषणाईत आणि प्रकाशात साजरा करण्याची विनंती केली होती, आणि त्याचेच पालन करत संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील त्यांचं मुबंई मधलं घर सजवलं आहे. आज श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आहेत, तर पाहुयात मुकेश अंबानी यांच्या घरची एक झलक..

अंबानींनी कसं समजावलंय घर ?

श्रीराम आज अयोध्येत परतले आहेत, आणि त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी जमेल तशी तयारी केली होती. आपल्या देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील मागे न राहता मुंबईमधल्या त्यांच्या निवास्थानाला म्हणजेच अन्टेलिया ला वेगळाच स्वरूप दिलंय. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रित अनेक दिगज्ज मंडळींपैकी मुकेश अंबानी एक असून त्यांनी पत्नी नीता अंबानी यांच्यासह अयोध्येत हजेरी लावली आहे(Ram Mandir Pratishta). मुकेश अंबानी यांनी मंदिर सोहळ्याच्या निमिताने आजूबाजूच्या लोकांसाठी अन्नसेवा सुरु केली असून, ट्विटरवर मुकेश अंबानी यांच्या भव्य निवास्थानाची चित्र पाहायला मिळतात.

संपन्न झाला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा : (Ram Mandir Pratishta)

आज दुपारी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. दरम्यान देशभरातील विविध क्षेत्रांमधून कलाकार, उद्योगपती आणि इतर सर्व मान्यवरांनी अयोध्येत या न भूतो, न भविष्यती सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. मुकेश अंबानी यांच्याप्रमाणे देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी देखील सदर दिवसाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती.