Ram Temple Inauguration : 22 जानेवारी रोजी भारतात मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. देशभरात चालली धावपळ पाहता बाजारी तज्ञांच्या मते सोहळा संपन्न झाल्यानंतर येणाऱ्या दोन ते तीन वर्षात जगभरातून 300,000 पेक्षाही अधिक भक्त रामचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येची वाट धरतील. अयोध्येत होणारे हे मोठे बदल लक्ष्यात घेता अनेक गुंतवणूकदार इथे गुंतवणुकीचे विविध मार्ग शोधात आहेत. बाकी सर्व क्षेत्रांच्या तुलनेत हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रातील गुंतवणूकदार शेअर्सकडे जास्ती लक्ष देतील. वर्ष 2023 मध्ये उत्तरप्रदेशात झालेल्या ग्लोबल समिटमध्ये जवळपास इथे 49,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर काही कंपन्यांचे स्टॉक दमदार कामगिरी करू शकण्याचा अंदाज वर्तवला जातोय, या कंपन्या नेमक्या कोणत्या हे आज जाणून घेऊया
१) Praveg : वर्ष 2005 मध्ये सुरु झालेली ही अहमदाबादची कंपनी आहे. ही भारतातील प्रायोगिक पर्यटनातील एक अग्रणी कंपनी असून ती प्रदर्शन, कार्यक्रम व्यवस्थापन आणि आदरातिथ्याची सेवा प्रदान करते. आपल्याला अयोध्या, दमण आणि दिऊ, रान ऑफ कच्छ,वाराणसी यांसारख्या ठिकाणी कंपनीचा व्यवहार सुरु असलेला पाहायला मिळतो. मागच्या आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती, त्यामुळे राम मंदिर उद्घाटनानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखीन वाढ होईल का हे पाहावं लागेल.
२) Indian Hotels and Taj GVK Hotels : बाजारी तंज्ञानाच्या मतानुसार येणाऱ्या काळात अयोध्येतील होसपेटीलिटी क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे. 5-स्टार हॉटेल्सपासून इतर सर्वत्र ठिकाणी भक्तांची आणि पर्यटकांची रांग लागलेली पाहायला मिळू शकते. अयोध्येत मंदिर सर्वांसाठी खुलं झाल्यानंतर अयोध्या ही जागा भारतातील अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक म्हणून गणली जाणार आहे. अद्याप हे क्षेत्र सर्वांसाठी खुलं नसतानाही हॉटेल्स कंपनी (IHCL) ताज हॉटेल्स आणि विवांता सारख्या प्रतिष्ठित ब्रँडची मालकी असलेल्या हॉटेल्सची अयोध्येत सुरुवात झाली आहे.
३) InterGlobe Aviation and SpiceJet : अयोध्या नगरीत सुरु झालेल्या महर्षी वलमीकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर Indigo आणि Air India Express यांची विमान सेवा सुरु झाली आहे. मात्र मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर केवळ या दोन विमान कंपन्यांच नाही तर स्पाईसजेट या विमान कंपनीला देखील भरपूर फायदा होऊ शकतो. तुमच्या मनात अयोध्येचा प्रवास करण्याची इच्छा असेल तर स्पाईसजेटने 1 फेब्रुवारी 2024 पासून अयोध्येला चेन्नई, बेंगळुरू आणि मुंबईशी जोडणारी नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे ही बातमी लक्ष्यात ठेवा(Ram Temple Inauguration).
४) IRCTC : केवळ विमान सेवाच नाही तर रेल्वेमार्गाने देखील अयोध्येचा प्रवास करणं शक्य आहे, आणि राम भक्तांची ओढ पाहता येणाऱ्या काही दिवसांत बाकी क्षेत्रांप्रमाणेचे रेल्वेला देखील याचा फायदा होऊ शकतो. भारतीय रेल्वेने 19 जानेवारीपासून देशाच्या विविध भागांतून अयोध्येपर्यंत 1,000 हून अधिक रेल्वे सुरु करण्याची योजना आखली आहे, त्यामुळे IRCTC चे शेअर्स येणाऱ्या काही दिवसांत किती मोठा पल्ला गाठू शकतात हे पाहावं लागेल.
५) EaseMyTrip, Thomas Cook and Yatra Online : अयोध्या ही श्रीरामांची जन्मभूमी आहे, आणि अयोध्येच्या वाढत्या आकर्षणामुळे आता साहजिकपणे इथे जगभरातून अनेक भक्त तसेच पर्यटक येतील. या सर्वांचा प्रवास सोयीस्कर व्हावा म्हणून रेल्वे, विमान आणि बाकी ट्रॅव्हल कंपन्या आपले नियोजन आखात आहेत. EaseMyTrip, Thomas Cook and Yatra Online या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधल्या काही नामांकित कंपन्या हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हलिंग आणि पर्यटनमध्ये यात्रेकरूंची मदत करतात. अयोध्या मंदिर 23 जानेवारीपासून सर्वांसाठी खुलं होईल आणि यानंतर वरील सर्व कंपन्यांच्या शेअर्सची उलाढाल पाहणं रंजक ठरेल.