Ranbir Kapoor Income: अभिनेता रणबीर कपूर हा आजही देशातील अनेक तरुण प्रेक्षकांच्या मनात “चॉकलेट बॉय” म्हणून प्रसिद्ध आहे. सावरिया, ये जवानी है दिवानी, रॉकस्टार आणि अलीकडेच आलेल्या ब्रह्मास्त्र अशा अनेक चित्रपटामुळे गोंडस चेहऱ्याच्या रणबिर कपूरने अनेक चहात्यांच्या मनात आपलं स्थान पक्कं केलं आहे. मागच्या महिन्यात क्रिकेटच्या विश्वचषकामुळे देशातील प्रेक्षक वर्ग सिनेमांना बाजूला सारत क्रिकेटच्या दिशेने वळत होता, मात्र रणबिर कपूर याचा सध्या चर्चेत असलेला Animal हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे लोकांच्या रांगा पुन्हा एकदा सिनेमा घराच्या बाहेर पहायला मिळतात. या चॉकलेट बॉयचा एक वेगळाच अंदाज ऍनिमलच्या माध्यमाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर मोठे धुमाकूळ घालतोय. रणबिर कपूर शिवाय यात नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना, एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आणि बॉबी देवल यांचाही समावेश आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का रणबिर कपूर याचा केवळ चित्रपट हा एकच व्यवसाय नसून या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमधून तो भरघोस कमाई करत असतो….
रणबिर कपूर करतो अशीही कमाई : (Ranbir Kapoor Income)
माध्यमांच्या माहितीनुसार रणबिर कपूर दरवर्षी सुमारे 30 कोटी रुपयांपर्यंतची कमाई करतो. आणि त्याच्याकडून प्रत्येक चित्रपटासाठी किमान 50 कोटी रुपये तरी आकारले जातात या अभिनेत्याची एकूण संपत्ती 345 कोटी रुपयांची आहे. तर आज, चित्रपटांशिवाय इतर अनेक माध्यमांच्या आधारे रणबिर कपूर त्याच्या संपत्तीत वाढ करतोय तरी कशी हे पाहूयात.
खेळ: आपल्या देशात क्रिकेटच्या IPL प्रमाणेच ISL ही फुटबॉलचे स्पर्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज मंडळी वेगवेगळ्या संघांमध्ये गुंतवणूक करत असतात, तसेच रणबिर कपूरने इंडियन सुपर लीग मध्ये मुंबई सिटी एफसी या कंपनीची निवड करत विमल पारेख यांच्यासह 35 टक्क्यांची भागीदारी मिळवली आहे.
गाणी: बदलत्या तांत्रिक जगात आता आपल्या आवडती गाणी डाऊनलोड करून ऐकावी लागत नाही, कारण ऑनलाईन स्ट्रीमिंगमध्ये तुम्ही आवडीनुसार वेगवेगळ्या गाण्यांची निवड करू शकता. ऑनलाइन गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात अनेक ॲप्सचा समावेश असतो आणि यातीलच एक प्रमुख नाव म्हणजेच सावन. सावन ही एक म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी आहे आणि रणबिर कपूर वर्ष 2014 पासून या कंपनीचा शेअर होल्डर तसेच ब्रँड अँबेसिडर आहे (Ranbir Kapoor Income).
शेअर्स: या व्यतिरिक्त रणबिर कपूरने पुण्यातील ड्रोन स्टार्टअप कंपनी “ड्रोन आचार्य एरियल” मधील शेअर्स विकत घेतलेले आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार रणबिर कपूरने सुमारे 20 लाख रुपयांचे 37 हजार 200 शेअर्स खरेदी केले आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का रणबिर कपूर याची पैसे कमवण्याची साधन इथेच थांबत नाहीत त्याच्या इतर गुंतवणुकीमध्ये बेकोचा समावेश आहे. ही कंपनी कंपोस्टेबल कचरा पिशव्या, रियूजीबल किचन टॉवेल, फ्लोर क्लीनर बांबू टू ब्रश अशा प्रकारची विविध उत्पादने तयार करते.
रियल इस्टेट: मुंबई ही अनेकांसाठी मायानगरी आहे, मुंबईत गेल्यानंतर कधी ना कधीतरी यश नक्कीच आपल्याला मिळेल म्हणून कित्येक लोकं धडपड करत असतात. याच मायानगरीत वांद्रे येथे रणबीर कपूर त्याची मालमत्ता गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने देत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार यातून त्याला 48 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळते (Ranbir Kapoor Income)
जाहिराती: आणि इतर कलाकारांप्रमाणे रणबिर कपूर सुद्धा एशियन पेंट्स, लेनोवो, मिंत्रा आणि इतर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती करतो ज्यामधून त्याला सुमारे ६ कोटी रुपयांपर्यंत धनादेश दिला जातो.