Ranvir Singh Investment: रणवीर सिंग आहे Boatचा नवीन चेहरा; कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीची एकूण रक्कम किती?

Ranvir Singh Investment: आपल्या देशातील प्रसिद्ध ऑडिओ वेअरेबल ब्रँड(Audio Wearable Brand) म्हणजेच Boat आणि आजच माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार Boatने सर्वांचा चाहता अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत एक करार केलाय, आणि या करारमुळेच आता रणवीर सिंग Boat चा नवीन ब्रँड एमब्रेसेडर(Brand Ambassador) बनला आहे, माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंगने कंपनीमध्ये काही टक्क्यांची गुंतवणूक केली असून ही गुंतवणूक नेमकी किती टक्क्यांची आहे हे पुढे जाणून घेऊया, मात्र Boat कंपनीचा अधिकृत चेहरा म्हणून आता रणवीर सिंगची निवड झाली आहे.

रणवीर सिंग आता असेल Boatचा चेहरा: (Ranvir Singh Investment)

Boat कंपनीचे मालक अमन गुप्ता यांनी दिलेला माहितीनुसार आता रणवीर सिंग Boatचा नवीन चेहरा असणार आहे, आणि रणवीर सिंग ने हा करार पक्का केल्याने कंपनीला भरपूर फायदा कमावण्याची संधी मिळेल. अगदीच अमन गुप्ता यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास ते म्हणता की “रणवीर सिंहने बोट कंपनीत केलेली गुंतवणूक क्रांती घडवून आणेल. आम्ही एकमेकांसोबत कंपनीचा विस्तार करू. तसेच बाजारात आमची छाप सोडू.” आज जरी रणवीर सिंग हा कंपनीचा नवीन चेहरा बनला असला तरीही याआधी जेमिमाह रॉड्रिग्ज, कियारा अडवाणी, रश्मिका मंदाना, हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारखे नामांकित चेहरे Boatचा भाग बनले होते.

Boat कंपनीचे उत्पन्न किती?

2023 हे आर्थिक वर्ष Boat कंपनीसाठी चढ-उतारांनी भरलेले होते. एका बाजूला, कंपनीने 3,377 कोटी रुपयांची विक्रमी कमाई नोंदवली तर दुसरीकडे, त्यांना 129.4 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. सध्या बोटला नॉईज, फायर-बोल्ट आणि एमआय सारख्या स्टार्टअप्सकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या कंपन्या ग्राहकांना कमी किमतीत उत्तम दर्जाची उत्पादने देतात आणि यामुळे बोटला आपली बाजारपेठ टिकवून ठेवणे कठीण होत आहे.

तरीही बोट अजूनही भारतातील टॉप वेअरेबल ब्रँड आहे(Ranvir Singh Investment). इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननुसार 2023 च्या पहिल्या सहामाहीत बोटने 26.6 टक्क्यांचा मार्केट शेअर मिळवला आहे. तसेच कंपनीने तोटा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत आणि सध्या त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यावर आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.