Ratan Tata Deepfake Video: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना यांच्या डीपफेक व्हिडिओ बद्दलची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर केली जात होती. रश्मिका मंदानानंतर कटरीना कैफ देखील या डीपफेक व्हिडिओचा शिकार होताना दिसली. पण हे डीपी व्हिडिओ प्रकरण काही बॉलीवूड पर्यंत सिमित राहिले नसून प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटाबद्दल देखील एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडिओमध्ये रतन टाटा ऑनलाइन सट्टेबाजीचे समर्थन करताना दिसतात. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया…
Ratan Tata Deepfake Video:
आपण जरी तांत्रिक बदल घडवून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असलो, तरी देखील काही अंशी हे तांत्रिक बदलं अनेकांसाठी साठी डोकेदुखी बनत आहेत. काही लोकं या टेक्नॉलॉजीचा चूकीचा वापर करून हे गुन्हेगारी प्रवृत्तीला बढावा देत आहेत. अलीकडेच दक्षिण चित्रपटांमधली प्रमुख अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला, नंतर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कटरीना कैफ याचा शिकार बनली आणि आता या दोघी नंतर देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या बद्दल देखील एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे, यात रतन टाटा ऑनलाइन सट्टेबाजीला प्राधान्य देताना दिसतात.
कसा आहे हा डीपी व्हिडिओ?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवलेला डीपफेक व्हिडिओ खरा मानू नये. यात दाखवली गेलेली व्यक्ती जरी हुबेहूब दिसत असली तरीही हि केवळ टेक्नॉलॉजीची कमाल आहे. सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडिओमध्ये (Ratan Tata Deepfake Video) ते म्हणतात की, “लोकं मला दरवेळी श्रीमंत कसं व्हावं याबद्दल विचारतात, माझा मित्र अमीर खान याच्याबद्दल सांगतो. भारतात अनेक लोकांनी एव्हिएटर हा खेळ खेळून लाखो रुपये कमावले आहेत, यात जिंकण्याचे 90% खात्री असते”.
समोर आलेल्या वृत्तानुसार अमीर खान नावाचा हा माणूस @aviator_ultrawin असं नाव वापरून सोशल मीडियावर टेलिग्राम चालवतो, या आपल्या चॅनलवरून तो लोकांना एव्हिएटर सट्टेबाजी करून दिवसाला एक लाख रुपये कमावण्याचे आमिष दाखवतो. या माणसाकडून रतन टाटा यांच्या एका जुन्या व्हिडियोचा वापर फायनान्शियाल फ्रॉड आणि स्केम करण्यासाठी करण्यात आलेला आहे.