Ratan Tata: रतन टाटा यांच्या विश्वासाचे पात्र आणि टाटा समूहाचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे एन. चंद्रशेखरन हे गेल्या सात वर्षांपासून टाटा समूहाची यशस्वीरित्या कमान संभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक बनला आहे. रतन टाटा यांच्या विश्वासावर खरे उतरत चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या प्रगतीला मोठा हातभार लावला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने 128 अब्ज डॉलरची झेप घेतली. टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादानंतर चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे चेअरमन बनवण्यात आले होते.
रतन टाटांचा राईट हँड कोण? (Ratan Tata)
चंद्रशेखरन यांचा जन्म तमिळनाडूतील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी अभ्यासात आणि करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत टाटा समूहात प्रवेश मिळवला, एकेकाळी ते टाटा समूहात इंटर्न म्हणून रुजू झाले होते आणि आज ते समूहाचे सर्वोच्च नेतृत्व करत आहेत. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आणि अनेक यशस्वी उपक्रमांची सुरुवात केली. टाटा समूहाची आर्थिक उलाढाल आणि बाजारपेठेतील हिस्सा या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
चंद्रशेखरन यांचा पगार किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये चंद्रशेखरन यांचा वार्षिक पगार 65 कोटी रुपये होता. 2021-22 मध्ये तो वाढून 109 कोटी रुपये झाला, ज्यामुळे ते देशातील सर्वाधिक पगार घेणारे CEO बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने प्रचंड प्रगती केली. 2022 मध्ये त्यांनी कंपनीचा नफा 64,267 कोटी रुपयांपर्यंत वाढवला, जो 2017 मध्ये 36,728 कोटी रुपये होता. या पाच वर्षांत टाटा समूहाचा(Ratan Tata) महसूल 6.37 लाख कोटी रुपयांहून वाढून 9.44 लाख कोटी रुपये इतका झाला होता.