Ratan Tata : सोशल मिडिया म्हणजे तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं आणि उपयोगी साधन आहे. सोशल मिडियावर चालणारी कोणतीही गोष्ट या पिढीला आकर्षित करते किंवा जबरदस्त वाटते. सोशल मिडियावर त्यांचे अनेक चाहते असतात, ते अनेक जणांना फॉलो करतात. अनेकवेळा यात प्रसिद्ध खेळाडू, सिनेस्टार यांचा समावेश होतो. त्याच सोशल मीडियावर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी नवा विक्रम केला आहे. रतन टाटा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे भारतीय उद्योगपती बनले आहेत.
ट्विटरवर टाटांचे 12.6 मिलीयन फोलोवर्स- Ratan Tata
सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत रत्न टाटा यांनी आनंद महिंद्रा यांना मागे टाकत सोशल मिडियाच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावलं आहे. हुरून इंडिया रिच लिस्टच्या अहवालानुसार वर्ष 2023 मध्ये रतन टाटा यांचे X वर म्हणजेच Twitter वर रतन टाटा यांचे 12.6 मिलीयन फोलोवर्स आहेत. आणि या मोठ्या आकड्यामुळे ते देशातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे उद्योगपती बनले आहेत. एका वर्षात लक्षणीय कामगिरी करत त्यांनी फोलोवर्सच्या यादीत नवीन 8 लाख लोकांना सामील करून घेतले व यामुळेच रतन टाटा (Ratan Tata) यांचे 12.6 मिलियन फोलोवर्स बनले आहेत. यापूर्वी ते X वर जास्ती काय सहभाग घेत नव्हते पण कदाचित आता त्यांनी सोशल मिडियाचे गांभीर्य ओळखत आपला सहभाग वाढवला असावा.
वन वेल्थ इंडिया रिच लिस्ट असं म्हणते:
360 वन वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2023च्या अहवालानुसार रतन टाटा (Ratan Tata) हे भारतातील सर्वाधिक फोलोवर्स असलेले उद्योगपती आहेत. त्यांच्यानंतर आनंद महिंद्रा यांचे नाव यादीत पाहायला मिळते. आनंद महिंद्रा यांचे X वर 10.8 मिलियन फोलोवर्स आहेत. भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रकाशित झालेली हि 12 वी आवृत्ती आहे. दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अंबानी यांचे नाव आहे, अदानी समूहाच्या संपत्तीत घट झाल्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.