RBI Action Against Bajaj Finance : बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई; नेमकं काय आहे प्रकरण?

RBI Action Against Bajaj Finance : तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक आहात का? हो तर कंपनीच्या बाजूने एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हि बातमी तुम्हाला ग्राहक म्हणून माहिती असणं फारच गरजेचं आहे त्यामुळे नक्की लक्षपूर्वक वाचा. रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance ) eCOM आणि Insta EMI कार्डच्या कर्ज मंजूर करणे आणि कर्ज वितरण करण्याच्या प्रक्रियेवर बंदी घातली आहे. आता याचा अर्थ काय होतो आणि ग्राहकांसाठी हि बातमी एवढी महत्वाची का आहे हे जाणून घेऊया..

RBIची बजाज फायनान्सवर मोठी कारवाई: (RBI Action Against Bajaj Finance)

देशातील सर्व बँकाच्या हालचाली सांभाळणारी बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया, आता या सर्वोच्य बँक कडून आलेल्या माहितीनुसार त्यांनी बजाज फायनान्स या लोकप्रसिद्ध कंपनीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 45L (1) (B) अंतर्गत बजाज फायनान्स लिमिटेडला(Bajaj Finance) कर्ज मंजूरी आणि वितरण थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या आदेशाचा परीणाम ग्राहकांवर कसा होतो तर, या आदेशानंतर कंपनी तिच्या ग्राहकांना आता eCOM आणि Insta EMI कार्ड वरुन कर्ज देऊ शकणार नाही.

रिझर्व बँक म्हणते कि बजाज कंपनीकडून डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन करण्यात आलेले नाही आणि म्हणूनच बँकेने त्यांच्या विरोधात कारवाई (RBI Action Against Bajaj Finance) केली आहे. आणि बँकचा हा आदेश  eCOM आणि Insta EMI कार्ड या बजाज फायनान्सच्या दोन कर्ज उत्पादनांना लागू होत असल्यामुळे ग्राहकांनी यांची नोंद घेणं महत्वाचं आहे.