RBI Action On Banks : RBI कडून ICICI आणि कोटक महिंद्रावर कारवाई; नेमकं काय आहे प्रकरण?

RBI Action On Banks : रिझर्व बँकला देशातील सर्व बँकांची अधिकारी मानलं जातं, याचाच अर्थ असा कि देशात चालेल्या सर्व बँकिंग विषयीचे महत्वाचे निर्णय आणि गरज पडल्यास रिझर्व बँकला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असतो. आपण अशी अनेक उदाहरणं पहिली असतील जिथे या सर्वोच्य बँकने चुकीच्या कामासाठी अनेक बँकांना तसेच आर्थिक संस्थांना दंड दिला आहे. आज समोर आलेली बातमी सांगते कि रिझर्व बँकने कोटक महिंद्रा आणि ICICI बँकच्या विरोधात कारवाई केली आहे. या दोन्ही बँका देशातील अनेक नामवंत बँकांपैकी आहेत, तसेच अनेक राज्यांमध्ये त्यांच्या शाखा पाहायला मिळतात. मग नेमक्या कोणत्या कारणामुळे कोटक महिंद्रा व ICICIच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला पाहूयात.

रिझर्व बँकची कोटक महिंद्रा विरुद्ध कारवाई : RBI Action On Banks

रिझर्व बँकच्या नियमांचे पालन न केल्यामुळे कोटक महिंद्रा आणि ICICI बँकच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व बँकने या कोटक महिंद्राला 3.95% तर ICICI बँकला 12.19% दंड ठोठावला आहे. ICICI बँक खासगी क्षेत्रात काम करते. या बँककडून कर्ज आणि अग्रिम वैधानिक आणि इतर निर्बंध ( Loans and advances- Statutory and other restrictions) आणि व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे फसवणूक वर्गीकरण आणि अहवाल (Fraud classification and reporting by commercial banks and selected financial institutions) या संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.

कोटक महिंद्रा बँक बद्दल सांगायचं झाल्यास रिझर्व बँकच्या म्हणण्यानुसार या बँक कडून वित्तीय सेवांच्या अकाऊन्टसोर्सिंग मधील जोखीम व्यवस्थापना आणि आचारसंहिता (Risk Management and Code of Conduct), बँकांनी गुंतवलेले रिकव्हरी एजंट, बँकमधली ग्राहक सेवा, क्रेडीट आणि एडव्हांस- वैधानिक आणि इतर निर्बंध(Statutory and other restrictions) यासंबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई (RBI Action On Banks) करण्यात आली आहे.