RBI Action On Banks : देशातील सर्वोच्य बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया… देशातील इतर सर्व बँकांबाबत सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी या बँकेला असते. बँकिंग क्षेत्रात बनवल्या जाणाऱ्या योजना, नियम आणि त्यांची अंमलबजावणी RBI द्वारे केली जाते. एखादी बँक जर का अनुशासनांचे पालन करत नसेल तर तिला दंड ठोठावण्याचा संपूर्ण हक्क RBI ला दिला गेला आहे. याच सर्वोच्य बँक कडून अनेक बँकांच्या नावे दंडात्मक नोटीस जारी झालेल्या बातम्या तुम्ही ऐकल्या असील आणि आज देखी अशीच एक बातमी समोर आली आहे, RBIने नेमका कोणाचा नवे धड ठोठावला आहे जाणून घेऊया.
RBIने 3 बँकांना ठोठावला दंड- RBI Action On Banks
रिझर्व बँक ऑफ इंडियाने काल म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी दोन सरकारी बँकांच्या नावे दंड ठोठावला आहे. आणि दंड ठोठावलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, सिटी बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्रातील काही महत्वाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या तिन्ही बँका शिक्षा भोगण्यासाठी पत्र ठरल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं सिटी बँकेला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर बँक ऑफ बडोदाला 4.34 कोटी रुपये आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI ने का दिलाय दंड:
RBI हि सर्वोच्य बँक असल्यामुळे बँकिंग नियमांचे पालन न करण्याऱ्या देशातील कोणत्याही बँकेला ती दंड (RBI Action On Banks) देऊ शकते. त्याप्रमाणेच बँकिंग नियमन कायदा 1949चे उल्लंघन केल्यामुळे आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सिटी बँकेच्या नावे दंडाची रक्कम लागू झाली. तर बँक ऑफ बडोदाला लार्ज कॉमन एक्सपोजरशी संबंधित केंद्रीय राखीव निधीच्या निर्मितीशी संबंधित काही निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड देण्यात आलाय आणि शेवटी इंडियन ओव्हरसीज बँकने कर्ज आणि एडव्हास संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे ती देखील दंड भरायला कारण बनली आहे.