RBI Decision: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, रविवार असलेला 31 मार्च हा दिवस सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांसाठी दररोज प्रमाणे कामाचा दिवस म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे, म्हणजेच या दिवशी देखील देशातील बँका काम करणार आहे. देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच RBI ने सर्व बँकांना 2023-24 च्या आर्थिक वर्षातील सरकारी प्राप्ती आणि देयकांची अंतिम नोंद करण्यासाठी 31 मार्च रोजी कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
देशातील बँका सुरु राहणार: (RBI Decision)
आर्थिक वर्ष (FY) 2023-24 च्या सरकारी व्यवहारांची दाखल घेण्यासाठी म्हणून सर्वोच्य बँकेने 31 मार्च रोजी सर्व सरकारी व्यवहार करणाऱ्या बँकेच्या शाखा खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तुमच्या थकीत कर भरण्याची किंवा इतर सरकारी देयकेची रक्कम जमा करण्याची राहिलेली असेल, तर आता 31 तारखेच्या रविवारीही तुम्ही बँकेत जाऊ शकता.
आधी आयकर विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार देशातील बँकांना 29 मार्च (गुड फ्राइडे), 30 मार्च (शनिवार) आणि 31 मार्च (रविवार) 2024 अशी सलग मोठी सुट्टी देण्यात आली होती, मात्र आज जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार या तीनही दिवशी देशभरातील सर्व सरकारी अख्त्यारीखाली येणाऱ्या बँका(RBI Decision) कामकाजासाठी खुल्या ठेवल्या जातील.