RBI Governor Salary : RBI गव्हर्नरला दर महिना किती पगार मिळतो? रघुराम राजन यांनी केला खुलासा

RBI Governor Salary : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) हि देशातील सर्वोच्य बँक आहे आणि बँकेच्या द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व निर्णयांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरीक तसेच बँकांसाठी क्रमप्राप्त आहे. मात्र कधी या सर्वोच्य बँकेच्या गव्हर्नरला किती पगार मिळत असेल याचा विचार केला आहे का? गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले होते आणि या विधानामुळेच सध्या ते सर्वत्र चर्चेत आहेत. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी डिमॉनेटायझेशनचे परिणाम,चांगले अर्थमंत्री कोण अश्या अनेक विषयांवर प्रकाश टाकला होता. सोबतच त्यांनी देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला मिळणार पगार आणि सुख सुविधा यांबद्दलही खुलासा केला होता. रघुराम राजन नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया…

RBI गव्हर्नरला दर महिना इतका पगार मिळतो? ? (RBI Governor Salary)

सध्या भारताची अर्थव्यव्यस्था हि जगभरात सर्वात अधिक जोमाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे. आणि सध्या आपल्या समोर नवीन रोजगार निर्माण करणे आणि देशातील कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रित करणे अशी दोन महत्वाची आव्हाने आहेत असे माजी गव्हर्नर यांनी सांगितले. सदर मुलाखती दरम्यान त्यांना सर्वोच्य बँकेच्या गव्हर्नरला नेमका किती पगार मिळतो?(RBI Governor Salary) किंवा त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात असे प्रश्न विचारले असता माजी गव्हर्नरांनी या सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली. हि प्रश्न उत्तरांची शृंखला राज शमामी यांच्या युट्युब चॅनेलवर घेण्यात आली होती.

रिझर्व्ह बँकच्या माजी गव्हर्नरांच्या म्हणण्यानुसार त्यांना गव्हर्नरचे पद भूषवित असताना 4 लाख रुपये पगार दिला जायचा, मात्र आताच्या घडीला कार्यरत गव्हर्नरला दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दल त्यांना खास माहिती नाही. पण त्यांचे म्हणणे आहे कि पगारापेक्षाही एका गव्हर्नरला मिळणारी सर्वात सुंदर सुविधा म्हणजे त्यांना देण्यात येणारं घर. मुंबईमध्ये मलबार हिल येथे धीरूभाई अंबानी यांच्या घराजवळ रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरला राहायला सरकारतर्फे घर दिलं जातं. पण तुम्हाला या घराची किंमत माहिती आहे का? कदाचित हा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण सर्वोच्य बँकेच्या गव्हर्नरला देण्यात येणाऱ्या घराची किंमत 450 कोटींच्या आसपास असेल. कारण हे घर एका लॉन्ग टर्म लीजवर घेतलं जातं. हे घर सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे, इथे वैद्यकीय सेवा आणि घरकाम करायला स्टाफ दिला जातो. शेवटी, सरकारी कर्मचारी आणि रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर यांच्यात फरक एवढाच कि त्यांना इतरांप्रमाणे कार्यकाळ संपल्यानंतर पेन्शनची सुविधा दिली जात नाही.