RBI Monetary Policy 2024: RBI ने जाहीर केला मोठा निर्णय; “Repo Rate बदलणार नाही”

RBI Monetary Policy 2024: भारतीय रिझर्व्ह बँकेची(RBI) आज रेपो रेट संधर्भात बैठक झाली. निवडणुका जवळ असल्यामुळे बँक नक्कीच एखादा महत्वाचा निर्णय घेईल अशी शंका होतीच पण महत्वाची बातमी म्हणजे RBI ने पुन्हा एकदा रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आपल्या देशात रेपो रेट 6.5 टक्के आहे आणि सर्वोच्य बँककडून रेपो रेट कायम ठेवण्याची ही सातवी वेळ आहे. या निर्णयामुळे आता तुमचा कर्जावरचा EMI देखील वाढणार नाही हे लक्ष्यात ठेवा.

रेपो रेटमध्ये बदल नाही: (RBI Monetary Policy 2024)

गेल्या वर्षी मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान RBI च्या बैठकांमध्ये रेपो रेट 2.5 टक्क्यांनी वाढला होता, पण त्यानंतर मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. आजच्या बैठकीत RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या धोरणात्मक बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, म्हणजेच पुढील एक वर्षात बँकेकडून मिळणाऱ्या कर्जांच्या व्याजदरांमध्ये (EMI) सध्या तरी कोणताही बदल होणार नाही.

RBI ने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग येत्या वर्षात 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बैठकीतून समोर आलेल्या माहितीप्रमाणे पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ 7.1 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.9 टक्के आणि तिसऱ्या-चौथ्या तिमाहीत 7 टक्के अश्याप्रकारे असण्याची शक्यता आहे. या सकारात्मक अर्थव्यवस्थेमुळे देशातील रोजगार वाढेल आणि गुंतवणुकीच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

महागाई आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न:

या बैठकीत महागाई (Inflation) हा मुद्दाही महत्वाचा विषय ठरला. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई 4.5 टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे(RBI Monetary Policy 2024). त्याचबरोबर, अत्यावश्यक वस्तूंच्या महागाईमध्ये (Core Inflation) थोडीशी घट झाल्याचेही दास यांनी नमूद केले. मात्र पुढील काळात खाद्यपदार्थांच्या किंमती (Food Inflation) वर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.