RBI MPC Meet: शक्तिकांत दास यांनी केल्यात ‘या’ मोठ्या घोषणा; याचा सामान्य माणसावर परिणाम काय?

RBI MPC Meet: भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीची (MPC) बैठक 8 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्याचा आपल्या सर्वांवर थेट परिणाम होणार असल्याने तुम्ही याबद्दल नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. रिझर्व्ह बँक ही आपल्या देशातील सर्वोच्य बँक असल्याने त्यांच्याकडून घेतल्यात आलेले निर्णय पाळणे आपल्यासाठी बंधनकारक आहे, चला तर मग जाणून घेऊया RBI चे नवीन बदल कोणते…

रेपो दर बदलणार नाही: (RBI MPC Meet)

RBI गव्हर्नर यांनी आज म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 क्रेडिट धोरणाबाबत घोषणा करताना सांगितले की, सहापैकी पाच सदस्यांनी व्याजदरांमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. MSF दर आणि बँक दर 6.75 टक्क्यांवर स्थिर असेल आणि SDF दर 6.25 टक्क्यांवर स्थिर राहील. RBI ने व्याजदर बदलले नाहीत कारण त्यांना अर्थव्यवस्थेची वाढ टिकवून ठेवायची आहे आणि महागाई नियंत्रित करायची आहे.

FY25 मधील चौथ्या तिमाहीत GDP वाढीचा अंदाज 6.9 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.4 टक्क्यांवरून 7 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्क्यांवरून 6.8 टक्के आणि पहिल्या तिमाहीत 6.7 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या सर्व आकड्यांवरून लक्ष्यात येतं की आता भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकते.

रबी हंगामातील पेरणीमध्ये चांगली प्रगती, महागाई नियंत्रणात:

रबी हंगामातील पेरणीमध्ये चांगली प्रगती झाली आहे. यामुळे, 2025 आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दर 4.5 टक्क्यांपर्यंत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2024 आर्थिक वर्षासाठी 5.4 टक्के असलेला किरकोळ महागाईचा अंदाज कायम ठेवण्यात आला असून 2025च्या चौथ्या तिमाहीत किरकोळ महागाई दर 4.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच एका विधानात म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था आत्मविश्वासाने पुढे जात आहे. गेल्या एका वर्षात रुपया हे चलन स्थिर आणि मजबूत राहिले असल्याने भविष्यातही त्यात स्थिरता राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.