RBI On 2000 Notes : यावर्षी देशात झालेल्या अनेक महत्वाच्या बदलांपैकी सर्वात मोठा बदल म्हणजेच 2000 रुपयांची नोट बंदी. काही दिवसांपूर्वीच ही नोट बाजारी वापरातून कायमची बंद करण्यात आली होती. सर्वोच्च बँकेच्या आदेशानुसार आता 2000 हजार रुपयांची नोट आर्थिक व्यवहारात वापरता येणार नाही असा संदेश जारी करण्यात आला होता .आणि त्यानंतर देशातील अनेक रहिवाशांनी स्वतः जवळच्या नोटा पुन्हा एकदा बँक मध्ये जमा करायला सुरुवात केली, मात्र रिझर्व बँक ऑफ इंडियाने आज पुन्हा एकदा याबाबतीत एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. नवीन निर्णयात काय म्हणते आरबीआय(RBI) जाणून घेऊया….
2000 रुपयांबद्दल काय म्हणते RBI?(RBI On 2000 Notes)
देशातील सर्वोच्च बँक म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया, या बँकेने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या अनेक नोटा बँक मध्ये पुन्हा जमा करण्यात आल्या आहेत. सर्क्युलेशन मधल्या 97 टक्क्यांपेक्षाही अधिक नोटा पुन्हा एकदा सरकार जमा झाल्याची नोंद बँकने केलेली आहे. आज आपल्या महत्वाच्या सुनावणीत RBI म्हणते की आता 2000 रुपयांच्या नोटा या लीगल टेंडर म्हणजेच कायदेशीर निविदा बनून राहतील.
यंदाच्या वर्षी बँक कडून घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे 2000 रुपयांच्या नोटांचा व्यवहार कायमचा बंद करणे हाच म्हटला पाहिजे (RBI On 2000 Notes). साधारण मे महिन्यापासून 2000 रुपयांच्या नोटा पुन्हा बँकेच्या स्वाधीन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या प्रक्रियेला मिनी नोटबंदी असंही म्हटलं जात होतं.
मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होतं जे की आता नोव्हेंबर 2023 मध्ये 9,760 कोटी रुपयांवर येऊन पोहोचलं आहे. RBIच्या म्हणण्यानुसार अजून मोठ्या प्रमाणात नोटा परत आलेल्या नाहीत आणि जरी 2000 रुपयांची नोट कायदेशीर निविदा म्हणून राहिली तरीही ती परत करण्यासाठी लोकांना रिझर्व बँकच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे. तसेच रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार या नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, त्यामुळे देशवासीयांनी निश्चिंत राहावे .
2000 ची नोट बाजारात कधी आली?
वर्ष 2016 मध्ये मोदी सरकारच्या अंतर्गत घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय ठरला तो म्हणजे नोटबंदी आणि नोटबंदीच्या प्रकरणानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 रुपयांची नोट ही बाजारी कामकाजासाठी उपलब्ध करून देण्यात आली (RBI On 2000 Notes). तुम्हाला माहिती आहे का? वर्ष 2019 पासूनच 2000 रुपयांची छपाई कायमची बंद करण्यात आली होती. देशातील 2000 रुपयांच्या नोटांचे सर्क्युलेशन नियंत्रणात आणण्यासाठी 2019 पासूनच नोटीची छपाई बंद केली होती अशी माहिती RBIने दिली आहे .आणि यानंतर आपला नोट बंदीचा महत्त्वाचा निर्णय जारी करत बँकेने लोकांना नोटा पुन्हा एकदा जमा करण्यासाठी पुरेसा वेळही दिला होता.