RBI Order: आपल्या देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या नवीन आदेशानुसार या महिन्याच्या 30 आणि 31 तारखेला देशातील सरकारी अख्त्यारीखाली येणाऱ्या सर्व बँका आणि सरकारी कामकाज पाहणारी कार्यालये खुली असणार आहेत. आत याचं कारण काय तर नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याआधी हेच दोन दिवस बाकी राहतात म्हणून काही कामं अडकून राहू नयेत आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय जनहितार्थ घेण्यात आला आहे.
या महिन्यांती बँका खुल्या राहणार: (RBI Order)
या महिन्यात 30 आणि 31 तारखेला सरकारी बँका खुल्या राहणार आहेत. लक्ष्यात घ्या की दरवेळेला अशी सुविधा दिली जात नाही, मात्र यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरु होईल आणि म्हणून देशभरातील कर भरणाऱ्या रहिवाश्यांना थोडासा जास्ती अवधी मिळावा म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय बाकी राहिलेली सर्व कार्यालयीन कामं पूर्ण व्हावीत म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयकर विभागाची कामं सांभाळणाऱ्या कार्यालयांना कामकाज सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तुमचं आयकरच्या बाबतीत काही काम बाकी आहे का?(RBI Order) हो तर चिंता करू नका कारण या महिन्यात शेवटच्या दोन दिवशी सुद्धा बँका खुल्या राहतील, तसेच Income Tax च्या बाबतीत काम करणारी सर्व कार्यालये देखील यावेळी तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानुसार मार्च 2024 च्या शेवटच्या दोन दिवशी देशभरात एजन्सी बँका(Agency Banks) खुल्या राहतील. एजन्सी बँका म्हणजे सरकारी पावती आणि देयके व्यवस्थापित करण्यासाठी अधिकृत बँका होय आणि आपल्याकडे यात 12 सरकारी आणि 20 खाजगी बँकांचा समावेश होतो.