RBI Rule On Personal Loan : आता तुमचाही EMI वाढण्याची शक्यता; पर्सनल लोनबाबत नवीन नियम जारी

RBI Rule On Personal Loan : रिझर्व बँक हि आपल्या देशातील सर्वोच्य बँक असल्यामुळे तिच्या नियमांचे पालन करणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते, हे प्रत्येकासाठी अनिवार्यच आहे. रिझर्व बँक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काही घोटाळा केल्याबद्दल कुणालाही दंड देऊ शकते तसेच बँकिंग क्षेत्रातील नियम तयार करणे हे काम सुद्धा रिझर्व बँकेच्या हातात आहे. हि बँक गरजेनुसार देशातील वित्तीय हालचालींमध्ये फेरबदल करू शकते. अलीकडेच बँकने आपल्या चलनविषयक धोरणांची घोषणा करताना पर्सनल लोनच्या बाबतीत चिंता व्यक्त केली होती, आणि देशातील बँकांना यावर लगाम लावण्याचे प्रयत्न सुरु करण्याचा आदेश दिला होता. मात्र बँका यात अयशस्वी ठरल्यामुळे रिझर्व बँकने काही नियम जास्ती कठोर केले आहेत…

पर्सनल लोनच्या बाबतीत नियम कठोर: (RBI Rule On Personal Loan)

गेल्या महिन्यात चलनविषयक धोरणाची घोषणा करताना रिझर्व बँकने पर्सनल लोनबाबत चिंता व्यक्त केली होती आणि देशातील सर्व बँकांना आपापल्या परीने हि वाढती संख्या आवरती घेण्याचा आदेश दिला होता. मात्र बँका यामध्ये अयशस्वी ठरल्या आणि म्हणूनच आता रिझर्व बँकने पर्सनल लोनच्या बाबतीत नियम जास्ती कठोर केले आहेत. यामुळे आता देशातील बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) वैयक्तिक कर्जासाठी जास्त रक्कम आकारावी लागणार आहे

बँकच्या नवीन नियमांप्रमाणे आता घर, शिक्षण आणि वाहन क्षेत्रातील कर्ज, सोने आणि दागिन्यांसाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जांना वगळता इतर सर्व कर्जांची जोखीम समायोजन पातळी 100 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे (RBI Rule On Personal Loan), ज्याच्या परिणामी आता ग्राहकांना जास्ती प्रमाणात व्याजदर भरावा लागू शकतो. RBI च्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये भारतातील व्यावसायिक बँकांची एकूण वैयक्तिक कर्जाची रक्कम 47.40 लाख कोटी रुपये होती जीचा आकडा वर्ष 2022 मध्ये केवळ 36.47 लाख कोटी रुपये होता.