RBI Rules For KYC । रिझर्व बँकला आपल्या देशातील सर्वात मोठी बँक समजली जाते, देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्व महत्वाचे निर्णय RBI कडून घेतले जातात. हल्लीच RBI ने काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ICICI आणि कोटक महिंद्राच्या विरोधात कारवाई केली होती. आणि RBI कडून आता KYC( Know Your Costumer) च्या अंतर्गत बँकांना काही नियम लागू करण्यात आले आहेत. काय आहेत हे नवीन नियम आणि नेमक्या कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत हे जाणून घेऊया…या आहेत
बँकच्या नवीन सूचना : RBI Rules For KYC
बँककडून ग्राहकांची पडताळणी अजून मजबूत करण्यासाठी RBI अंतर्गत येणाऱ्या बँका आणि वित्तीय कंपन्यांना वेळोवेळी KYC अपडेट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. RBI कडून यावेळी मुख्य मार्गदर्शक तत्वांमध्ये काही सुधारणा करण्यात आली आहे. आता बँका, इतर वित्तीय सेवांना विहित प्रक्रियेनुसार त्यांच्या ग्राहकांची योग्य काळजी घ्यावी लागेल. RBI ने यावेळी मनी लोंडरिंग, बेकायदेशीर क्रियाकलाप आणि सामूहिक विनाशाची शस्त्रे आणि त्यांची वितरण प्रणाली, इत्यादी कायद्याशी संबंधित सरकारच्या नवीन सूचनांनंतर RBI ने KYC च्या नियमांमध्ये (RBI Rules For KYC) काही सुधारणा केली आहे, बँकचे म्हणणे आहे कि त्यांनी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स यांच्या अनुशांगाने नवीन सूचना जारी केल्या आहेत.
या नवीन सूचनांच्या आधारे अद्यातानांसाठी जोखीम आधारित दृष्टीकोन सुधारण्यात आले आहेत, आता यामुळे केंद्रीय बँकच्या नियमांखाली वावरणाऱ्या सर्व बँका किंवा वित्तीय संस्थांना KYC चे नियतकालिक अपडेट करण्यासाठी जोखीम आधारित दृष्टी कोनांचा स्वीकार करणे अनिवार्य आहे, यावेळी जिथे धोक्याची शंका वाटते तिथे ग्राहकांची तपासणी करतेवेळी घेतलेली माहिती राहून ठेवली जाईल.