REC Solar Norway : मुकेश अंबानी विकणार ‘ही’ कंपनी; मात्र कोणासोबत पक्की केली 2.2 कोटी डॉलर्सची डील?

REC Solar Norway : संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी नेहमीच त्यांच्या कुशल व्यावहारिक डावपेचांमुळे चर्चेत असतात. आज देखील मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अखत्यारीखाली असलेली एक कंपनी विकण्याची घोषणा केली असल्याने पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय बनले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने(Reliance Industries) दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच REC Solar Norway ही कंपनी विकण्याच्या मार्गावर आहेत, सदर कंपनी सोलर होल्डिंगची कंपनी आहे आणि ती स्कॅन्डिनेव्हियन देशात पॉलिसिलिकॉनचे (Polysilicon) उत्पादन करते. सर्वत्र बोलबाला असलेल्या रिलायन्सच्या उपकंपनीने वर्ष 2021 मध्ये या कंपनीची जबाबदारी स्वीकारली होती. आता मात्र मुकेश अंबानी या कंपनीला तब्बल 22 मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये ओस्‍लो लिस्टेड एल्‍केमला विकण्याच्या तयारीत आहेत.

रिलायन्स कंपनीची भन्नाट डील: (REC Solar Norway)

रिलायन्स इंडस्ट्रीज या रिलायन्स कंपनीच्या उपकंपनीने REC Solar Norway ही कंपनी विकण्यासाठी बाजारात उतरवलेली असून कंपनीच्या देवाणघेवाणीचा करार ओस्‍लो लिस्टेड एल्‍केम(Elkem ASA) सोबत पक्का झाला आहे. या कंपनीचे हक्क विकल्यानंतर अंबानींच्या खात्यात 2.2 मिलियन अमेरिकन डॉलर्स अंबानींच्या खात्यात जमा होणार आहेत. कंपनीने स्टोक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार विक्री होणाऱ्या कंपनीवर आत्तापर्यंत REC सोलर होल्डिंगची संपूर्ण मालकी होती, मात्र 14 जानेवारी 2024 रोजी एल्केम ASA या कंपनीसोबत त्याचा 100 रुपये प्रति शेअरचा करार झालेला असल्याने लवकरच ही कंपनी विकली जाणार आहे.

काय आहे एल्केम ASA?

रिलायन्स कंपनीने करार केलेली एल्केम ASA ही कंपनी एक सिलिकॉन बेस्ड कंपनी आहे, या कंपनीचे नाव तुम्हाला ओस्लो स्टॉक एक्सचेन्जमध्ये देखील पाहायला मिळेल. 10 ऑक्टोबर 2021 रोजी, भारतीय समूह रिलायन्स इंडस्ट्रीजने घोषणा केली होती की त्यांची उप कंपनीरिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेड(New Solar Energy Limited) यांनी चायना नॅशनल ब्लूस्टार ग्रुपकडून 771 दशलक्ष डॉलर्समध्ये REC चे संपूर्ण नियंत्रण मिळवले होते.