Recession In IT : IT आयटी क्षेत्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाची घट झाली आहे. हे आर्थिक वर्ष IT क्षेत्रासाठी काही चांगलं ठरलेलं नाही. आणि आता पुन्हा एकदा या क्षेत्रासाठी अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरात सध्या आर्थिक मंदी सुरु आहे आणि या परिस्थितीचा वाईट परिणाम या न त्या कारणाने अनेक कर्मचारी वर्गावर झालेला दिसला. यावर्षी केवळ सुरुवाताची सहा महिन्यात जगभरातील 2.12 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.
IT क्षेत्राला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका:
जगभरात अनेक क्षेत्रांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे पण सर्वाधिक नुकसान IT क्षेत्राने भोगले आहे. आणि जगातील अनेक कंपन्यांसोबत भारतातील कंपन्यांचा यात समावेश होतो. आपल्या देशात या घडीला 10 कंपन्या चांगली कामगिरी करीत आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात आणि दिवसेंदिवस त्यांचा आकडा घसरला आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 या नऊ महिन्यांत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या संख्येत घट झाली आहे (Recession In IT ).
हे आर्थिक मंदीचे संकेत? (Recession In IT )
IT क्षेत्रात सप्टेंबर ते मार्च हा कालावधी कामाच्या दृष्टीने फारसा चांगला नसतो. तरीही जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत नोकऱ्या कमी होणे हे भारतीय आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत आहेत असे तज्ञ म्हणतात. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस इत्यादी मोठाल्या आयटी कंपन्यासोबत इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. देशात वर्षाच्या सुरुवातीला 21.10 लोकं या क्षेत्रात काम करायची जो आकडा आता घसरून 20.60 लाखांवर पोहोचला आहे आणि गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये एवढी घट झाली आहे.