Red Sea Attacks: आपण या जगाचा एक भाग असल्यामुळे जागतिक स्तरावर होणाऱ्या विविध बदलांचा थेट परिणाम हा भारतावर देखील झालेला दिसून येतो. या संपूर्ण वर्षात आपण इस्राएल-हमास, रशिया-युक्रेन यांसारख्या मोठ्याला युद्धाचा झालेला परिणाम सहन केला होता. मात्र ही कठीणाई अद्याप इथेच थांबलेली नाही, कारण सध्या हमासला पाठिंबा देणाऱ्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांना बंदुकीच्या टोकावर निशाणा बनवायला सुरुवात केली आहे. या दरोडेखोरांनी लालसागराला पूर्णपणे युद्धाचे मैदान बनवले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा विपरीत परिणाम भारतावर का आणि कसा? तर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या म्हणण्यानुसार लाल समुद्रातील समस्यांमुळे भारताच्या तांदूळ निर्यातीवर परिणाम होत आहे. हे प्रकरण मुळातच गंभीर असल्यामुळे येणाऱ्या दिवसांत आपल्याला कोणत्या अडचणींच्या सामना करावा लागू शकतो यावर एक नजर फिरवूया…
बातमी वाचण्याआधी जाणून घ्या कि, लाल समुद्र(Red Sea), हिंद महासागर(Indian Ocean) आणि भूमध्य समुद्र (Mediterranean Sea) यांना जोडणाऱ्या मार्गाची लांबी सुमारे 2000 किमी आहे. या मार्गाचा जगभरात होणाऱ्या व्यवहारांवर सर्वात मोठा भाग असतो कारण जगातील 40 ते 45 टक्के व्यापार हा याच मार्गाने केला जातो. दरवर्षी 17,000 हून अधिक जहाजे सुएझ कालव्यातून (Suez Canal) जातात. सुएझ कालवा हा युरोप आणि आशियामधील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे.
लालसागरावरील युद्धाचा परिणाम भारतावर का? (Red Sea Attacks)
देशाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटल्याप्रमाणे लाल समुद्रात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तांदळाच्या निर्यातीवर दिसून येऊ शकतो, आत्तासाठी याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नसली तरीही महिन्याच्या शेवटी मिळणारा निर्यातीचा नवीन आकडा आपल्याला याबद्दल स्पष्ट माहिती पुरवेल. सध्या लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राला हिंदी महासागराशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या बाब- अल- मंडेब समुद्रच्या आसपासची परिस्थिती हौथी अतिरेक्यांच्या हल्ल्यांमुळे बिघडली आहे(Red Sea Attacks). केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार अद्याप तांदळाच्या निर्यातीवर याचा मोठा परिणाम दिसून आलेला नसला तरीही महिन्याच्या शेवटी याबद्दल सखोल निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
या समुद्री मार्गावरून 30 टक्के महत्त्वाच्या वस्तूंची ने आण केली जाते आणि या वर्षभरात विविध कारणांमुळे हा मार्ग अडचणींचा सापळा बनला आहे. बाब-अल-मंडेब या या अरबी नावाचा अर्थ गेट ऑफ इयर्स असा होतो. जो कि व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मार्ग समजला जातो. भौगोलिक दृष्टीने याचं महत्त्व तपासायला गेल्यास हा मार्ग भूमध्य समुद्र आणि हिंद महासागर यांना लाल समुद्र आणि सुएझ कालव्याद्वारे जोडते आणि आफ्रिकेला अरबी द्वीपकल्पापासून वेगळे करतो.
भारतीय व्यवहाराला सुरक्षित ठेवण्यासाठी नौदलाची मोहीम:
तज्ञांच्या मते सध्या लालसागरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारताला सोसावा लागू शकतो, कारण हा संघर्ष वाढला तर येणाऱ्या काळात बासमती तांदळाची इजिप्त आणि युरोपीय देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवर थेट परिणाम दिसून येईल. या परिस्थितीचे गांभीर्य जाणून भारतीय नौदलाकडून कच्चे तेल भारतात येणाऱ्या मार्गावर पाच शक्तिशाली युद्धनौका दाखल केल्या आहेत(Red Sea Attacks). हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जवळपास 75 टक्के कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गाने केला जातो, म्हणूनच या पाचही युद्धनौका भारतीय व्यापाराचे दरोडेखोरांपासून रक्षण करतील.