Red Sea AttackS : लाल समुद्रातील तीन जहाजं बुडवत अमेरिकेने केला 10 हुथी बंडखोरांचा खात्मा; जागतिक व्यापाराचा केंद्रबिंदू आजही धोक्यात…

Red Sea Attacks: गेल्या काही दिवसांपासून हमास या आतंकवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजावर हल्ला करायला सुरुवात केली होती. लाल समुद्र हा जगभरातील व्यवहाराचा केंद्रबिंदू असल्यामुळे या बंडखोरांचा हल्ल्याने त्याचे रूपांतर एका युद्धाच्या मैदानात झाले आहे. लाल समुद्रावर चालणाऱ्या या भयंकर युद्धाचा परिणाम आपल्या देशातील व्यापारावर देखील दिसून येणार आहे. भारतीय व्यापाराचे रक्षण करण्यासाठी नौदलाकडून पाच युद्धनौका समुद्रात तैनाद करण्यात आल्या होत्या. आज याच युद्धाच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार लाल समुद्रामध्ये अमेरिकेने मोठी कारवाई केल्यामुळे बंडखोरांच्या तीन जहाजांना हानी पोहोचली असून दहा हुथी बंडखोरांचा खात्मा झाला आहे.

अमेरिकेने केला 10 बंडखोरांचा खात्मा: (Red Sea Attacks)

लाल समुद्रात चाललेल्या या भीषण लढाईमध्ये अमेरिकेने मोठी कारवाई बजावली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार हुथी बंडखोर समुद्रात एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यास आले होते, सिंगापूरचा झेंडा असलेल्या व्यापारी जहाजावर हल्ला करण्यास आलेल्या हुथी भंडखोरांवर ताबडतोब अमेरिकेच्या लष्करी सैनिकांनी हल्ला केला (Red Sea Attacks). यानंतर शिप सेक्युरिटी टीम आणि अमेरिकेच्या सैनिकांनी सोबत येऊन हुथी बंडखोरांना परतवून लावले, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या प्रति हल्ल्यामुळे हुथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे. हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दहा हुथी नौदल जवान मृत किंवा बेपत्ता आहेत आणि यांच्यावर लाल समुद्रात अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला होता.

लाल समुद्र आहे व्यापाराचा केंद्रबिंदू:

सुएझ कालव्यातून जगभरातील जवळपास 12 टक्के व्यापार हा लाल समुद्रातून केला जातो, हा सुएझ कालवा युरोप आणि आशियाला एकत्र जोडत असल्यामुळे तो व्यापाराचा केंद्रबिंदू आहे. इजराइल आणि हमास यांच्या सुरू असलेल्या घनघोर युद्धानंतर आता हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात हल्ला चढवायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत त्यांनी अनेक व्यापारी कार्गो जहाजांवर हल्ला चढवला आहे. याच्या परिणामी अनेक मोठमोठ्याला कंपन्यांनी आपली जहाजं आहे, केप ऑफ गुड होपला वळसा घालून आशिया आणि युरोपमध्ये आणण्यास सुरुवात केल्यामुळे जगभरातील महागाई वाढू लागली आहे.

तज्ञांना मिळालेल्या माहितीनुसार या हुथी बंडखोरांना इराण या देशाचे समर्थन प्राप्त आहे. लाल समुद्रात वाढणाऱ्या या तणावाच्या परिस्थितीचा (Red Sea Attacks) विपरीत परिणाम सर्व जगाच्या व्यापारावर होताना दिसतोय. आपल्या भारतातील जवळपास 75 टक्के कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गाने केला जातो. तसेच बासमती तांदळाची इजिप्त आणि युरोपियन देशांमध्ये याच मार्गाने निर्यात केली जाते म्हणूनच वाढत्या तणावाचा परिणाम भारताला देखील भोगाव लागण्याची शक्यता आहे.