बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स फाउंडेशन संपूर्ण भारतातील 10 लाखांहून अधिक महिलांना सक्षम करेल. कंपनीच्या अध्यक्ष नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतीच Reliance Industries ची वार्षिक सर्वसाधारण मीटिंग (Reliance AGM) पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. रिलायन्स फाउंडेशनच्या या उपक्रमाअंतर्गत महिलांना दरवर्षी लाखो रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
महिलांना दरवर्षी किमान 1 लाख रुपये मिळवून देणार- (Reliance AGM)
याबाबत नीता अंबानी म्हणाल्या, ‘बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या भागीदारीत, आम्ही भारतभरातील 10 लाखांहून अधिक महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. आगामी तीन वर्षांमध्ये हा उपक्रम महिलांना कृषी आणि बिगर कृषी उत्पन्न मिळवून देणार्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेईल आणि त्यांना मदत सुद्धा करेल. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना दर वर्षाला कमीत कमी एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल.
Reliance foundation नुसार पुढील काळात Bill & Melinda Gates Foundation च्या मदतीने महिला सक्षमीकरणाची ही मोहीम पार पडली जाईल. नीता अंबानी यांनी केलेल्या या घोषणेनंतर उद्योगपती बिल गेट्स यांनीही आनंद व्यक्त केला आहे. भारताबद्दल आणि रिलायन्ससोबतच्या भागीदारीबद्दल आम्ही खूप आशावादी आहोत असं त्यांनी म्हंटल आहे .आम्ही 10 लाख महिलांना त्यांची क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून मदत करू तसेच रिलायन्स फाऊंडेशनसोबत (Reliance AGM) काम करण्याचे आमचे उद्दिष्ट या नव्या उपक्रमाला पाठिंबा देणे हेच आहे असं बिल गेट्स यांनी म्हंटल.