Reliance AGM : विमा क्षेत्रात अंबानींची एन्ट्री; बाकी कंपन्यांचे धाबे दणाणणार

बिझनेसनामा ऑनलाईन । Reliance समूहाची 28 ऑगस्ट रोजी (Reliance AGM) वार्षिक सर्वसाधारण मीटिंग पार पडली. यादरम्यान कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे Reliance समूहाने आता विमा क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कंपनी ग्राहकांना सामान्य विमा, जीवन विमा, आरोग्य विमा ऑफर करेल. अंबानी यांच्या या निर्णयांमुळे इतर विमा कंपन्यांचे टेन्शन मात्र वाढलं आहे.

विमा क्षेत्रात करणार Entry : (Reliance AGM)

Reliance ची जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस विमा क्षेत्रात प्रवेश करणार असून स्मार्ट विमा , जीवन विमा , सामान्य आणि आरोग्य विमा पुरवेल. ह्या सर्व बाबी डिजिटल इंटरफेसद्वारे ऑफर करण्यात येतील. Jio Financial Services ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी जागतिक स्तरावरील कंपनीसोबत भागीदारी करणार आहेत. Jio Financial Services भागीदारांसोबत संदर्भित उत्पादने तयार करण्यासाठी आणि ग्राहकांच्या गरजा खरोखरच अनोख्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी डेटा विश्लेषणाचा वापर करेल.

भविष्यात जिओ financial services Mutual फंड मध्ये गुंतवणूक करू शकते असे संकेत मुकेश अंबानी (Reliance AGM) यांनी दिले. Jio Financial Services ची एकूण संपत्ती 1,20,000 कोटी आहे.कंपनीने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या BlackRock सोबत करार केला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक संयुक्तपणे नवीन व्यवस्थापन कंपनी सुरू करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परवडणारी आणि पारदर्शक अशी गुंतवणूक उत्पादनांसह, Jio Financial Services भारतीय अर्थव्यवस्थेतील एका मोठ्या वर्गाच्या आर्थिक सेवा गरजांमधील मोठी पोकळी भरून काढण्यासाठी कटिबद्ध आहे असं अंबानी म्हणाले.