Reliance Capital: कधीकाळी, रिलायंस कॅपिटल शेअर बाजारातील एक नावाजलेली कंपनी होती. 2008 मध्ये त्याचे शेअर 2700 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात होते आणि कंपनीचे मार्केट कॅप 93,851 करोड रुपये होते. परंतु, कालांतराने परिस्थिती बदलली आणि कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली. वर्ष 2022 मध्ये 40,000 कोटी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेली रिलायन्स कॅपिटल विक्रीसाठी आली, आणि आता कंपनीला विकत घेणारा तारणहार मिळाला आहे.
अनिल अंबानींच्या कंपनीचा मालक कोण? (Reliance Capital)
40,000 कोटी कर्जाच्या ओझ्याखाली दडपलेली रिलायन्स कॅपिटल आता विकली जात आहे. हिंदुजा समूहाची इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IndusInd International Holdings Limited) या कंपनीला विकत घेण्यास तयार आहे आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) ने या व्यवहाराला मंजूरी दिली आहे. या व्यवहाराअंतर्गत, इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज रिलायंस कॅपिटलच्या ऋण आणि इतर दायित्वे स्वीकारेल. या बदल्यात, त्यांना रिलायंस कॅपिटलच्या व्यवसायांमध्ये नियंत्रक हिस्सा मिळेल. हिंदुजा ग्रुपच्या कंपनीने कर्जात बुडलेल्या या कंपनीला 9650 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यासाठी बोली लावली होती.
अनिल अंबानी यांची रिलायंस कॅपिटल आता हिंदुजा समूहाची इंडसइंड इंटरनेशनल होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी खरेदी करणार आहे(Reliance Capital). जून 2023 मध्ये NCLTच्या मुंबई बेंचने रिलायंस कॅपिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील बोलीत इंडसइंड इंटरनेशनल होल्डिंग्स लिमिटेडच्या योजनेला मंजूरी दिली असल्याने हिंदुजा समूह रिलायंस कॅपिटलला 8,640 कोटी रुपयांना विकत घेणार आहे, मात्र यात रिलायंस जनरल इन्शुरन्स( Reliance General Insurance) आणि रिलायंस निप्पॉन लाइफ इन्शुरन्स(Reliance Nippon Life Insurance) या कंपन्यांचा समावेश नाही.