Reliance-Disney Deal: भारत देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी दिवसेंदिवस त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या मार्गावर काम करत असतात. मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी वेळोवेळी अनेक क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करीत असते. सध्या अंबानी मनोरंजन आणि मीडिया या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याची तयारी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी तुम्ही अंबानी आणि वोल्ट डिस्नी यांच्यात झालेल्या कराराची बातमी वाचली असेलच. वोल्ट डिस्नी या प्रसिद्ध मनोरंजन प्लॅटफॉर्म प्रदान करणाऱ्या कंपनीला भारतात त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी एका सक्षम साथीची गरज होती आणि आता मुकेश अंबानी यांच्या मदतीने डिस्नी भारत देशात आपला व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. पाहायला गेलं तर मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात आणि ते अर्थातच यशस्वी उद्योगपती आहेत. वोल्ट डिस्नी आन अंबानी सोबत येऊन नेमका किती नफा कमावू शकतात हे पाहणं आता आकर्षक ठरणार आहे.
मुकेश अंबानी करणार मनोरंजनाचा व्यवसाय: (Reliance-Disney Deal)
मुकेश अंबानी वोल्ट डिस्नीच्या साहाय्याने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. यासाठो दोन्ही बलाढ्य कंपन्यांमध्ये नॉन-बायडिंग करार यशस्वी झाला आहे. गेल्या आठवड्यात लंडनमध्ये दोन्ही दिगजांमध्ये हा करार पूर्ण झाला (Reliance-Disney Deal) असून करार पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कंपन्या एकत्र येऊन जगभरात भारत आणि इंग्लंड या देशांमध्ये चालणारा मीडिया आणि मनोरंजनाचा व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या तयारीत आहेत.
दोन्ही कंपन्यांचे आता एकमेकांमध्ये विलीनीकरण होणार असून हे विलीनीकरण स्टॉक आणि कॅशमध्ये केले जाईल (Reliance-Disney Deal). या प्रक्रियेनंतर रिलायन्स कंपनीकडे एकूण 51 टक्के आणि वोल्ट डिस्नीकडे 49 टक्क्यांची हिस्सेदारी कायम राहील. हा करार फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. मात्र मुकेश अंबानी यांना हा करार जानेवारी महिन्यातच पूर्ण करायचा आहे अशी माहिती माध्यमांना मिळाली. करार पूर्ण होताच कुणा एकाच्या अधिपत्याखाली काम चालणार नाही तर दोन्ही मालक एकत्र येऊन हि जबाबदारी पार पडतील.
लंडनच्या बैठकीत अशी झाली चर्चा:
लंडनमध्ये झालेल्या बैठकीत केविन मेयर आणि अंबानी यांच्या वतीने मनोज मोदी उपस्थित होते. आता तंत्रज्ञानाच्या मते करार पूर्ण झाल्यानंतर राहिलेली सर्व कामे पूर्ण केली जाईल, यात मूल्यांकनाचाही मोठा समावेश आहे. विलीनीकरणात स्टार इंडिया आणि वायकॉम18 यांचा समावेश झाला आहे. भारतात स्टार इंडिया एकूण ७७ चॅनेल्स चालवते तर वयकॉम18 चे 38 चॅनल्स कार्यरत आहेत. यामध्ये Disney +Hotstar तसेच Jio Cinema यांचाही समावेश होतो. हा करार होण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये दोन महिन्याम्पासून चर्चा सुरु होत्या, सध्या दोन्ही पक्ष्यांना 45 ते 60 दिवसांचा विशेष कालावधी देण्यात आला असून त्यात परस्पर संमतीने अधिक वाढ होऊ शकते.