Reliance Disney Deal: मनोरंजनाचा धमाका! Reliance आणि Disney ची विलीनीकरणाकडे वाटचाल

Reliance Disney Deal: अमेरिकेची प्रसिद्ध मनोरंजन कंपनी Walt Disney आणि भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Reliance Industries या दोगांमध्ये भारतातील त्यांचे मालकी हक्क असलेल्या माध्यमांच्या व्यवसायांचे विलीनीकरण करण्यासाठी करार झाला आहे. या करारानुसार, Reliance आणि त्यांच्या सहयोगी कंपन्या विलीनीकरण झालेल्या कंपनीच्या किमान 61 टक्के मालकी हक्क मिळवतील तर उर्वरित वाटा Disney कडे राहील. आता या करारामुळे भारतीय मनोरंजन क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

भारत झालाय ऐतिहासिक करार: (Reliance Disney Deal)

Disney आणि Reliance Industries यांच्यातील कराराबाबत या आठवड्याच्या सुरुवातीला अधिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून दोन्ही कंपन्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या करारातील वाटा विभागणी अंतिम करारावर स्वाक्षरी करताना बदलू शकतो कारण, त्यावेळी डिझनीच्या इतर मालमत्तेचाही विचार केला जाईल.

भारतात Disney ला Subscriber राखणे आणि महत्त्वाचे मिडिया हक्क मिळवण्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे, Reliance गेल्या काही वर्षांत भारतातील मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात आघाडीवर आहे. या दोन कंपन्या एकत्र आल्यास, जागतिक स्थरावर वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात एक मजबूत मिडिया साम्राज्य उभे राहील.