Reliance-Disney Merger: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Disney इंडिया यांच्यातील ऐतिहासिक विलीनीकरणामुळे भारतातील क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रात मोठा बदल घडून येणार आहे. या विलीनीकरणामुळे, प्रेक्षकांना आता सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकाच Platform वर म्हणजेच Jio सिनेमावर पाहता येतील. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Disney Star India यांच्यातील जवळपास 70,352 कोटी रुपयांच्या विलीनीकरणामुळे भारतीय मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात मोठे बदल घडून येणार आहेत.
विलीनीकरणामुळे क्रिकेटचे चाहते खुश: (Reliance-Disney Merger)
क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिलायन्स डिजिटलचा Jio Cinema हा प्लॅटफॉर्म लवकरच भारतातील क्रिकेट स्पर्धांचे प्रसारण करणारा सर्वात मोठा Platform बनणार आहे. यात IPL, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि ICC च्या प्रमुख स्पर्धांचा समावेश असेल.
28 फेब्रुवारीला भारतातील दिग्गज कंपनी Reliance Industries आणि जगप्रसिद्ध मनोरंजन समूह Walt Disney यांच्यातील ऐतिहासिक विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे, म्हणजेच Competition Commission Of India (CCI) आणि इतर कायदेशीर संस्थांकडून मंजूरी मिळवणे होय. IPL 2024 आणि जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकावर या विलीनीकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही(Reliance-Disney Merger). या दोन्ही स्पर्धा नेहमीप्रमाणेच Star Sports आणि HotStar वरूनच प्रक्षेपित होतील, मात्र या विलीनीकरणामुळे Jio Cinema ला Champions Trophy प्रक्षेपित करण्याची संधी मिळेल.