Reliance-Disney Merger: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्ने यांच्या युतीमुळे भारताच्या स्ट्रीमिंग मार्केटच्या जवळपास 50 टक्के वाटा ते आपल्या ताब्यात घेणार आहेत. या महासंघामुळे Netflix आणि Amazon Prime Video सारख्या स्पर्धकांना मोठी आव्हानं सामोरी लागण्याची शक्यता आहे आणि या वाढत्या स्पर्धेमुळे किंमती कमी होतील की वाढतील, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारतात झालीये सर्वात मोठी हातमिळवणी: (Reliance-Disney Merger)
रिलायन्स आणि Walt Disney या दिग्गजांनी मिळून एक मेडिया महाशक्ती बनण्याची घोषणा केली. आपल्या भारत देशात जवळपास निम्मे इंटरनेट वापरणारे लोक Reliance Jio आणि JioTV यांच्यासोबत Disney च्या Hotstar वर चित्रपट, मालिका, बातम्या आणि क्रीडा पाहत होते असा धक्कादायक रिपोर्ट Bloomberg ने दिला आहे. यावरून आपल्याकडे किती मोठा ग्राहकवर्ग आहे हे सहज लक्षात येते, आणि म्हणूनच या करारानंतर निर्माण होणारी ही मिडीया कंपनी चित्रपट, मालिका, तसेच वृत्त आणि क्रीडा या सर्वांवर मनोरंजनाचा धमाका उडवणार आहे.
नीता अंबानींच्या अध्यक्षतेखाली चालणार कंपनी:
या युतीसाठी मुकेश अंबानी 11,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करणार आहेत, आणि या नव्या संयुक्त उपक्रमाचे मूल्य 70,352 कोटी रुपये इतके असणार आहे. या युतीमुळे भारतीय मनोरंजन क्षेत्रात आणखी चांगली स्पर्धा पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना अधिकाधिक मनोरंजनाचा अनुभव मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
या नवीन उपक्रमाचे नियंत्रण रिलायन्सकडे राहील, मात्र मालकी हक्क मात्र वेगळे असतील. यामध्ये रिलायन्सची हिस्सेदारी 16.34 टक्के, वियाकॉम 18ची हिस्सेदारी 46.82 टक्के आणि डिझनीची हिस्सेदारी 36.84 टक्के असेल. या संयुक्त उपक्रमाच्या (Reliance-Disney Merger) अध्यक्षा म्हणून नीता अंबानी आणि उपाध्यक्ष म्हणून उदय शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.