Reliance-Disney Merger: नवीन कंपनीच्या अध्यक्षपदी बसणार का नीता अंबानी?

Reliance-Disney Merger: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या भारतभरात पसरलेल्या ‘Reliance Industries’ आणि ‘Walt Disney’ यांच्या मीडिया मालमत्तेच्या विलीनीकरणातून उदयास आलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजवर अंबानी कुटुंबाची मालकी असून डिस्नेसोबतच्या या कराराने भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रावर रिलायन्सची पकड अधिक मजबूत होणार आहे.

नीता अंबानी होणार अध्यक्ष: (Reliance-Disney Merger)

संपूर्ण देशात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे Reliance आणि Disney यांच्यातील माध्यमांच्या विलीनीकरणाची. महिनोन्‌महिने चाललेल्या या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळणार असून या आठवड्यात या कराराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिलायन्स आणि डिस्नेने यापूर्वीच कराराला स्वाक्षरी केली असून अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स या नव्या एकत्रित कंपनीत 61 टक्के हिस्सा असणार आहे, तर उर्वरित हिस्सा डिस्नेकडे राहील.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि डिस्ने (Disney) यांच्यात वाटाघाटणी सुरू असून त्यांच्या संयुक्त उपक्रमात रिलायन्सची 51 ते 54 टक्के हिस्सेदारी असण्याची शक्यता असल्याची बातमी आणखीन एका वृत्ताने समोर आणली. या नव्या संयुक्त उपक्रमाचे नाव ‘Bodhi Tree’ असून त्यात जेम्स मर्डोक आणि उदय शंकर 9 टक्के हिस्सा घेईल, तर डिस्ने 40 टक्के हिश्यावर नाव लिहणार आहे(Reliance-Disney Merger). मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने या वाटाघाटणींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.