Reliance-Disney Merger : Reliance आणि Disney एकत्र येणार; स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात इतरांना धोका??

Reliance-Disney Merger : Relianceसर्वात मोठी कंपनी आहे, रिलायंस अंतर्गत मुकेश अंबानी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत असतात. आणि सध्या हि कंपनी मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. भारतात येत्या काही दिवसांत IPL 2024 ची सुरुवात होईल आणि अधिकाधिक प्रेक्षकवर्ग डिस्नी+हॉटस्टार तसेच जिओ सिनेमाकडे वळतील. गेल्या काही दिवसांपासून अंबानी आणि वोल्ड डिस्नी यांच्यामध्ये विलीनीकरणाचा करार झाला होता. माध्यमांना मिळालेल्या माहितीप्रमाणे डिस्नीच्या स्टार इंडियाचे अंबानींच्या व्हायकोम18 या कंपनीमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. आणि हा करार यशस्वी झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये शेअर्सची अदलाबदली करण्यात येईल.

अंबानी आणि डिस्नीमध्ये होणार हातमिळवणी: (Reliance-Disney Merger)

मुकेश अंबानी आणि डिस्नी यांच्यामध्ये करार झाल्यानंतर दोन्ही कंपन्या आपापल्या शेअर्सची अदलाबदली करणार आहेत. लक्ष्यात घ्या हे विलीनीकरण केवळ भारतीय बाजारपेठेपुरते मर्यादित असेल. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स कंपनी 51 टक्के शेअर्स घेईल आणि त्यानंतर डिस्नीकडे 49 टक्के शेअर्स बाकी राहतील. हातमिळवणी झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांचे अधिपत्य एकसमान राहणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही मजबूत कंपन्या सोबत येऊन स्ट्रीमिंग क्षेत्रात व्यवहार करणार आहेत.

भारतातील डिस्नीचा कारभार पहिला तर डिस्नी+हॉटस्टार आणि स्टार इंडिया यांची संपत्ती एकत्रित केली तर ती एकूण 60 ते 70 हजार कोटी रुपयांपर्यंत जाते. मात्र कंपनी त्यांची एकूण संपत्ती 83 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगते. भारतात डिस्नी+हॉटस्टार सर्वात पसंत केला जाणारा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे हा करार झाल्यानंतर पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांना भलामोठा फायदा होणार आहे. (Reliance-Disney Merger).

व्हायकोन 18 हि देखील अंबानींच्या अधिपत्याखाली येणारी एक कंपनी आहे. जिओ सिनेमा यांसारखे प्रमुख एप्स व्हायकॉनद्वारे चालवले जातात. विविध ऑफर्समुळे सर्वाधिक चर्चेत असणारा जिओ सिनेमा IPL 2024 च्या काळात सार्वधिक मागणीत असू शकतो. यापूर्वी IPLच्या प्रक्षेपणाचे हक्क केवळ हॉटस्टार जवळ होते मात्र आता जिओ सिनेमा मोफत दरात प्रेक्षकांसाठी IPL चे प्रक्षेपण करणार आहे.