Reliance Industries : देशातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणजे रिलायंस, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हि कंपनी नेहमीच नवनवीन पल्ले गाठत असते, आता देखील त्यांनी एका विदेश कंपनी सोबत बिलियन डॉलर्सचा करार केला आहे. या करारानंतर अंबानी यांच्या संपत्तीत बरीच वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहित आहे का हा करार जगातील एका प्रसिद्ध कंपनीसोबत करण्यात आला आहे आणि आता यानंतर अंबानी त्यांचा भारतातील व्यवसायातील मोठा वाटा सांभाळणार आहेत. तर नेमकी कोणती आहे हि कंपनी थोडक्यात जाणून घेऊया…
अंबानी यांनी केला मोठा करार : Reliance Industries
अंबानी आणि डिस्नी यांच्यात एक मोठा करार झाला आहे. सोमवारी समोर आलेल्या माहितीनुसार डिस्नी स्टार बिजनेसमधील अंबानी एक महत्वाचे स्टेक होल्डर ठरणार आहेत, यांची किंमत जवळपास 10 अब्ज डॉलर्स अशी आहे. अजून दोन्ही कंपन्यांकडून याबद्दल काहीही उल्लेख केलेला नसला तरीही पुढच्या महिन्यात या कराराबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान रिलायंस मिडियाच्या काही उपकंपन्या डिस्नीसोबत संधान बंधू शकतात.
अंबानी यांच्या व्यवसायत वाढ:
वर्ष 2022 मध्ये इंडिअन प्रीमियर लीग (IPL) स्ट्रीम करण्यासाठी अंबानी आणि डिस्नी यांच्यात 2.7 बिलियन डॉलर्सचा करार करण्यात आला होता. डिस्नी इंडियामध्ये स्टोक खरेदी केल्यामुळे आबांनी यांच्या मनोरंजन उद्योगात मोठी भर पडली होती. भारताच्या मनोरंजन व्यवसायान नुकसान सोसूनही डिस्नी या कंपनीने आपली गुंतवणूक कायम ठेवली होती, आणि यंदा भारतात सुरु असलेल्या क्रिकेट विश्व चषकामुळे त्यांनी पुन्हा एकदा भरपूर नफा कमावला आहे कारण भारत आणि न्यूझीलेंड यांच्यात झालेल्या सामन्यात त्यांना 43 मिलियन विवार्स मिळाले होते.