Reliance Industries : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायंस कंपनी हि आपल्या देशातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून ओळखली जाते, रिलायंसच्या अनेक शाखा देखील आहेत ज्या विविध क्षेत्रात काम करतात. काही दिवसांपूर्वीच या समूहाच्या पदाधिकारी आणि अंबानी कुटुंबाच्या सर्वेसर्वा नीता अंबानी यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पदावरून राजीनामा दिला. त्यांच्या नंतर आता या जागी अंबानींच्या तिन्ही मुलांना पद सांभाळण्याची संधी मिळणार आहे. अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवर काही प्रश्नचिन्ह उठवली जात होती, मात्र आता तिघांची नियुक्ती निश्चित झाली आहे.
आता तिन्ही मुलं सांभाळणार कंपनी: Reliance Industries
आज आलेल्या माहितीनुसार अंबानी समूहाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पदावर आता इशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या नियुक्तीवर भागधारकांनी स्वीकृती दाखवली आहे. तिघाच्या नियुक्तीसाठी एक मतदान घेण्यात आले होते ज्यात इशा अंबानी यांना 98.21 मत, आकाश अंबानी यांना 98.06 तर अनंत अंबानी यांना 92.75 मतांसह स्वीकृती मिळाली. आतापर्यंत तिन्ही मुलांकडून व्यवहारातील काही गोष्टी हाताळल्या जायच्या पण कुणाजवळ बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची धुरा सोपवण्यात आली नव्हती.
आधी असा सांभाळायचे व्यवहार:
गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी सर्वात मोठ्या मुलाला म्हणजेच आकाश अंबानी यांना रिलायंस जिओची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, तर बाकी दोघे म्हणजेच इशा अंबानी आणि अनंत अंबानी रिलायंस रिटेल फर्म आणि इतर व्यवहार बघायचे. मुकेश अंबानी यांच्या मते इशा आणि आकाश यांना रिलायंस जिओ आणि रिलायंस रिटेल यांच्यामुळे व्यवहार कसा सांभाळावा याबद्दल बरीच माहिती आणि शिक्षण मिळाले आहे. छोट्या अनंतनेसुद्धा आता या क्षेत्रात पदार्पण केले असून त्यालाही अनुभवातून शिकायला मिळेल. नीता अंबानी या आता आपल्या पदावरून मागे हटल्या असून, मुकेश अंबानी पुढील पाच वर्षांसाठी कंपनीची जबाबदारी सांभाळतील. आणि त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीची (Reliance Industries) मात्र पूर्ण जबाबदारी तिन्ही मुलांकडे सोपवली जाईल.