Reliance Industries Shares : केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणजेच मुकेश अंबानी. आज भारतीय शेअर बाजाराने सकाळपासूनच दमदार कामगिरी बजावली होती, आणि विशेष म्हणजे यात मुकेश बई यांच्या कंपनीने देखील बाजी मारली. बजेट सादर व्हायला केवळ दोन दिवस बाकी आहेत आणि आत्तापासूनच येणाऱ्या बजेटचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसतोय. आज म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने बाजारात कमालीची कामगिरी करून दाखवली, ती काय हे आज पाहुयात..
आज बाजारात मुकेश अंबानी अव्वल. का? (Reliance Industries Shares)
आज सकाळी शेअर बाजार उधडताक्षणी कंपनीच्या शेअर्सनी 2,729 रुपयांपासून सुरुवात केली आणि पुढे जात रिलायन्स कंपनीच्या याच शेअरने 2800 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. आजच्या संपूर्ण बाजारी कामकाजत रिलायन्स कंपनीच्या शेअरने 19 लाख कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे, या अभूतपूर्व कामगिरीमुळे कंपनीने 1 लाख कोटी रुपयांची कमाई केली असे बाजारी तज्ञांचे मत आहे आणि खास बाब म्हणजे आपल्या देशात असा विक्रम गाजवणारी आत्तापर्यंत केवळ ही एकाच कंपनी ठरली आहे.
गेल्या एका महिन्यापासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत होती, गेल्या तीन महिन्यांत 23 टक्के, तर संपूर्ण एका वर्षात अंबानींच्या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले आहेत आणि त्यांनी गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांचा परतावा दिलाय (Reliance Industries Shares). कंपनीच्या याच जबरदस्त कामगिरीवर गुंतवणूकदार खुश आहेत. आपण जर का रिलायन्स कंपनीचा तिमाही निकाल काढून पाहिला तर डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीने 5208 कोटींचा नफा कमावला आहे, या एकूण कामगिरीमुळेच आज कंपनी मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने सर्वात पहिल्या स्थानावर पाहायला मिळते.