Reliance Industries च्या यशात अंबानींसोबत ‘या’ व्यक्तीचाही मोठा वाटा; एकत्र कंपनी उभारली, पण नंतर…

बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) हि भारतातील नावाजलेली कंपनी आहे तर अंबानी (Ambani Family) याचं कुटुंब भारतातील श्रीमंत परीवारांपैकी एक. अंबानी आणि रिलायन्स यांना अजिबातच ओळखत नाही अशी कदाचितच कुणी माणसं असतील. मात्र तुम्हाला माहिती आहे का, हि रिलायन्स कंपनी उभी करण्यासाठी अजून एका व्यक्तीचा फार मोलाचा वाटा होता, त्याचं नाव होतं चंपकलाल दमानी (Champaklal Damani). चंपकलाल आणि अंबानी हे नातेवाईक तर होतेच शिवाय त्याच्यातील मैत्रीचं नातं देखील मजबूत होतं. तर कोण होते हे चंपकलाल दमानी हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

कोण आहेत चंपकलाल दमानी :

एखाद्या यशामागे असते ती कैक वर्षांची मेहनत, आणि घेतलेले कष्ट. आज रिलायन्स कंपनीला (Reliance Industries) जगभरात मान आणि सन्मान आहे, पण त्यामागे अपार कष्ट देखील आहेत. आज आपल्याला दिसणारं यश हे त्याच कष्टाचं फळ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरुवात धीरूभाई अंबानी यांनी केली होती, मात्र यात त्यांना मिळालेली मोलाची साथ होती चंपकलाल दमानी यांची.

चंपकलाल दमानी हे धीरुभायींचे चुलत भाऊ. पण नात्यापेक्षा त्यांच्यातील मैत्रीचं नातं जास्ती मजबूत होतं, रिलायन्सच्या सुरुवातीपासून चंपकलाल धीरुभाईसोबत होते. जेव्हा धीरूभाई यमनहून भारतात परतले तेव्हा त्यांच्याजवळ पैसे नव्हते. अश्या कठीण काळात चंपकलाल यांनी अंबानींना आर्थिक मदत देऊ केली होती. एकार्थाने रिलायन्समध्ये सर्वात आधी चंपकलाल यांनी पैसे गुंतवले होते.

भावा-भावांची नात्यापलीकडली मैत्री

सुरुवातीला धीरूभाई व चंपकलाल यांनी मिळून साखर आणि मसाल्यांचा व्यवसाय सुरु केला. रिलायन्सच्या जन्मात दोघांचा समान वाटा आहे, कारण दोघांनी सोबत येऊन 15 हजार रुपये खर्च करुन पहिले ऑफिस उघडले व व्यवसायाचा पाया रोवला होता. दोघे एकमेकांशी सल्ला-मसलत करून व्यवसाय सांभाळत होते. दोघांची हुशारी व मेहनत एवढी, कि एका वेळेस त्यांनी अरबच्या शेखला सुद्धा माती विकून पैसे मिळवले होते.

मात्र हळूहळू नात्यात व्यवसायाचा अडथळा निर्माण होऊ लागला, आणि आपलं नातं वाचवण्यासाठी त्यांनी व्यावसायिक संबंध संपवले. वर्ष 1965 मध्ये दोघांनी आपली भागीदारी संपवली असली तरी आजच्या यशात दोघांचा वाटा सामानाच आहे. आज जर का रिलायन्स इंडस्ट्रीजचं नाव सर्वदूर असेल तर त्यात अंबानी आणि दमानी अश्या 2 नावांचा समावेश आहे.