Reliance Insurance : विमा क्षेत्रात क्रांती घडवणार मुकेश अंबानी? पॉलिसी दरांमध्ये होऊ शकतो मोठा बदल

बिझनेसनामा ऑनलाईन । 28 तारखेला झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये Reliance Industries ने Insurance Sector मध्ये प्रवेश करण्याब्द्ल (Reliance Insurance) खुलासा केला होता. आत्ता ह्याच विमा व्यवसायात फायदा करवून देणाऱ्या Jio Financial Service limited साठी ते CEO च्या शोधात आहेत. असं म्हटलं जातं की आपल्या लाईफ, हेल्थ आणि जनरल इन्शोरन्स सेक्टर मध्ये प्रगती करण्यासाठी ते नवीन माणसांच्या शोधात आहेत. यासाठी विविध कंपनीज सोबत त्यांनी या बाबत चर्चा केलेली आहे. Korn Ferry आणि Spencer Stuart Inc. या त्या काही कंपन्यांपैकी आहेत ज्यांच्या सोबत Reliance Industries ने चर्चा केली आहे.

Policy दरांत मोठा बदल होऊ शकतो- (Reliance Insurance)

Jio Financial आपल्या विमा व्यवसायासाठी पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच एक CEO निवडणार आहेत. Reliance Industries चे मालक मुकेश अंबानी ह्यांच म्हणण आहे की येणार्या दिवसांत Jio Financial भारताच्या विमा क्षेत्रात मोठी प्रगती करणार आहे. ह्याचाच अर्थ असा की Jio Insurance Sector च्या Policy दरांत मोठा बदल घडवून आणू शकतो, ज्यामुळे ग्राहकांना देखील Policy Premium च्या किंमतीमध्ये घट झाल्यास मोठा फायदा होऊ शकतो. असं झाल्यास इतर विमा कंपन्यांना मात्र धक्का बसण्याची शक्यता आहे.

Jio Financial चे Non Executive Chairman आणि बँकर केवी कामथ ह्यांच्यावर कार्यकारी कर्मचाऱ्यांची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, इथे होणार्या कर्माचार्यांच्या निवडीवर त्यांची बारीक नजर असेल. असं म्हटलं जातंय की Jio आपला Insurance Business निर्माण करत आहे. आणि Chief Executive ची निवड ह्यातला सर्वात मोठा टप्पा असणार आहे. या Financial Service च्या CEO ची निवड Global Executive Head कडून केली जाईल तर बाकी कर्मचाऱ्यांची नियुक्ती Domestic Executive head कडून केली जाईल.